1 फेब्रुवारी दिनविशेष - [1 February in History] दिनांक 1 फेब्रुवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
दिनांक १ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
कल्पना चावला - (१७ मार्च १९६२ - १ फेब्रुवारी २००३) अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.
जागतिक दिवस
- शेती तंत्रज्ञान प्रसार दिन.
- तटरक्षक दिन.
- १६६२: ९ महिने वेढा घातल्यावर चीनच्या सेनापती कॉक्सिंगाने तैवान जिंकले.
- १७९०: न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सत्र सुरू झाले.
- १८१४: फिलिपाईन्सच्या मेयोन ज्वालामुखीचा उद्रेक १,२०० ठार.
- १८८४: ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित. तेव्हापासून ऑक्सफर्डच्या कोशांचे काम अव्याहतपणे चालूच आहे.
- १९१२: कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते) यांची “चाफा” हि कविता मनोरंजन मासिकात प्रसिद्ध झाली.
- १९६२: मराठा रेजिमेंट सिक्सची स्थापना
- १९८१: ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडमधील क्रिकेट एक दिवसीय सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यू झीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाउ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म फेकी करण्यास सांगितले. ट्रेव्हरने तसे केले, ऑस्ट्रेलिया सामना जिंकले परंतु यानंतर अंडरआर्म फेकी बेकायदा ठरवण्यात आली.
- २००२: आयर्लंडमधील शांतता प्रक्रियेला चालना देणार्या 'गुड फ्रायडे' कराराचे शिल्पकार जॉन ह्यूम यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा गांधी शांतता पुरस्कार प्रदान.
- २००३: अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी.
- २००४: मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार.
- १८८४: सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार.
- १९०४: बा.रा.घोलप, शिक्षणमहर्षी.
- १९१०: जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९१२: राजा नीलकंठ बढे, मुंबई आकाशवाणीवरील सुगम संगीत सदारकर्ते कवी.
- १९२७: म. द. हातकणंगलेकर, साहित्यिक.
- १९२९: जयंतराव साळगावकर, ज्योतिर्भास्कर.
- १९४४: स्व. अरुण टिकेकर, ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत.
- १९५८: जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता.
- १९७१: अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९८१: ग्रेम स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८१: डोनाल्ड विल्स डग्लस, सिनियर, अमेरिकन विमानतंत्रज्ञ.
- १९९५: मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार
- २००३: स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर -
मायकेल पी. अँडरसन
डेव्हिड ब्राउन
कल्पना चावला
लॉरेल क्लार्क
रिक डी. हसबंड
विली मॅककूल
इलान रमोन
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ |
अभिप्राय