कोजागिरीस दिसतो तो चंद्रमा नभात, प्रत्यक्ष रोज बघते मी तो तुझ्या रुपात
कोजागिरीस दिसतो तो चंद्रमा नभातप्रत्यक्ष रोज बघते मी तो तुझ्या रुपात
चंद्रास काय ठावे किती ओढ चकोरास
रमला नभी असे तो पाहून चांदण्यास
समीप तू असता कशाला पाहू चंद्रमा नभीचा
चांदणे तू चांदवा ही ऊच तू माझ्या मनीचा
रात्र काळोखी असो वा पौर्णिमा फुलली पहा
चांदवा माझ्या मनीचा देतसे मज गारवा