आठवण तुझी अशी की सरता सरत नाही, साठवून हे मन भरता भरत नाही
आठवण तुझी अशी की सरता सरत नाहीसाठवून हे मन भरता भरत नाही
चिंब पावसात मन भिजता भिजत नाही
जोवर नजरेत तू दिसता दिसत नाही
ओठी हसू माझ्या खुलता खुलत नाही
तुझ्या सहवासात मग तेच हटता हटत नाही
हातातला हात तुझा सुटता सुटत नाही
भेटीतला जिव्हाळा मिटता मिटत नाही
दृष्टीत तू माझ्या राहता राहा असा की
ओढ तुझी हि घटता घटत नाही