बोलवत तर मी ही नाही, तरीही यायचं टाळत तोही नाही
बोलवत तर मी ही नाहीतरीही यायचं टाळत तोही नाही
हसू दाखवत मी नाही
भाव दाखवत तोही नाही
नजरानजर झाली जरी
वाचायचं काय मला कळतच नाही
कसे काय तो भाव वाचतो
कोडे अजून उलगडत नाही
प्रेम म्हणजे गालिचे हसू नाजूक
कि ते हृदयातील हळवी धुकधुक
मीही त्याला सांगत नाही
अन् तोही अव्यक्तपणे सांगून जाई