८ जानेवारी दिनविशेष

८ जानेवारी दिनविशेष - [8 January in History] दिनांक ८ जानेवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
गॅलेलियो गॅलिली | Galileo Galilei

दिनांक ८ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


गॅलिलिओ गॅलिली - (१५ फेब्रुवारी १५६४ - ८ जानेवारी १६४२) इटलीचे भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते.


जागतिक दिवस
 • -
ठळक घटना / घडामोडी
 • १८३५: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.
 • १८८०: सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्‍च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.
 • १८८९: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले.
 • १९०४: पोप दहावा पायस याने चर्चमध्ये आखूड झगे घालून येण्यास बंदी घातली.
 • १९०८: बालवीर चळवळीस प्रारंभ
 • १९४७: जयपूर येथे राजस्थान विद्यापीठाची स्थापना.
 • १९५७: गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात पडून होते.
 • १९६३: लिओनार्दो दा विन्ची यांच्या मोनालिसा चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.
 • १९७१: स्वतंत्र बांगलादेश जाहीर केल्याच्या गुन्ह्याखाली अटक झालेल्या शेख मुजिबूर रहमान यांची तुरुंगातून मुक्तता.
 • २०००: लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
 • २००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.
 • २००४: आर.एम.एस. क्वीन मेरी २ या जगातील सगळ्यात मोठे प्रवासी जहाजाचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी हिच्याकडून नामकरण.
 • २००५: अणुऊर्जावर चालणारी यु.एस.एस. सान फ्रांसिस्को (एस.एस.एन.०७७१) ही पाणबुडी पाण्याखाली पूर्णवेगात असताना समुद्रातील डोंगराशी धडकली. एक खलाशी ठार. पाणबुडी पृष्ठभागावर येण्यात यशस्वी.
 • २००६: ग्रीसच्या कायथिरा बेटाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप.
जन्म / वाढदिवस
 • १८५१: कृषी, आरोग्य, देशी कारागिरीवर पुस्तके लिहिणारे बाळकृष्ण आत्माराम उर्फ भाऊसाहेब गुप्ते
 • १९०१: युद्ध आणि लष्करविषयक ग्रंथकार यशवंत श्रीधर परांजपे
 • १९०४: डॉ. मनोहर गोपाळ गुप्ते, समाजसेवक.
 • १९०९: आशापूर्णादेवी, ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणार्‍या प्रथम लेखिका.
 • १९२३: जॉनी वॉर्डल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९२४: गीता मुखर्जी, स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य.
 • १९२५: राकेश मोहन, हिंदी नाटककार
 • १९२६: केलुचरण महापात्रा, ओडिसी नर्तक
 • १९२९: सईद जाफरी, हिंदी व इंग्लिश अभिनेता.
 • १९३६: ज्योतिंद्रनाथ दिक्षीत, भारताचे परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
 • १९३९: नंदा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
 • १९४२: स्टीफन हॉकिंग, गणितज्ञ व इंग्लिश लेखक.
 • १९४५: प्रभा गणोरकर, मराठी लेखिका.
 • १९६५: चंपक रमानायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९७५: हॅरीस जयराज, संगीत दिग्दर्शक
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १३२४: मार्को पोलो, इटालियन शोधक.
 • १६४२: गॅलेलियो गॅलिली, इटालियन गणितज्ञ, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८८४: केशव चंद्र सेन, ब्राम्हो समाजचे नेते.
 • १९३४: अध्यात्मविषयक ग्रंथांचे लेखक परशुराम गोविंद चिंचाळकर.
 • १९६६: बिमल रॉय, हिंदी चित्रपट दिग्दर्शक.
 • १९६७: श्रीपाद कृष्ण बेलवलकर, प्राच्यविद्यापंडित. संस्कृत पंडित. अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.
 • १९७३: स.ज. भागवत, तत्त्वज्ञ व विचारवंत.गांधीवादी कार्यकर्तो सर्वोद्यी विचारवंत आचार्य.
 • १९७३: ना. भि. परुळेकर, दैनिक सकाळचे संस्थापक
 • १९८४: पहिल्या भारतीय महिला वैमानिक सुषमा मुखोपाध्याय.
 • १९९१: भास्कर धोंडो कर्वे, कर्वे समाज संस्थेचे संस्थापक.
 • १९९२: द. प्र. सहस्रबुद्धे, आनंद मासिकाचे संपादक.
 • १९९४: ६८वे शंकराचार्य परमाचार्य श्री. चंद्रशेखर सरस्वती.
 • १९९५: मधू लिमये, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी.
 • २००३: राजभाऊ एस. माने, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते.
 • २०१८: श्रीवल्लभ व्यास, आमीर खानच्या 'लगान' चित्रपट ईश्‍वर काकांची अविस्मरणीय भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते यांचे दीर्घ आजारने जयपूर येथे निधन झाले. ते 60 वर्षांचे होते.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.