९ जानेवारी दिनविशेष

९ जानेवारी दिनविशेष - [9 January in History] दिनांक ९ जानेवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
वासुदेव बळवंत फडके | Vasudev Balwant Phadke

दिनांक ९ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


वासुदेव बळवंत फडके - (४ नोव्हेंबर १८४५ - १७ फेब्रुवारी १८८३) भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते. आजच्या दिवशी वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आणि 'तेहरान' बोटीने त्यांना एडन येथे आणण्यात आले.


जागतिक दिवस
ठळक घटना / घडामोडी
 • १२८८: ज्ञानेश्वर महाराजांनी पैठण येथे रेड्याकडून वेद म्हणवून घेतले.
 • १३४९: प्लेगचे कारण ठरवून बासेल, स्वित्झर्लंडमधील ज्यूंना जाळण्यात आले.
 • १४३१: जोन ऑफ आर्कवर खटला सुरू.
 • १७६०: बरारी घाटच्या लढाईत अफघाणांकडून मराठ्यांचा पराभव.
 • १८६१: अमेरिकन यादवी युद्ध- मिसिसिपी अमेरिकेपासून विभक्त होणारे दुसरे राज्य झाले.
 • १८८०: वासुदेव बळवंत फडके, क्रांतिकारक यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा. 'तेहरान' बोटीने त्यांना एडन येथे आणण्यात आले.
 • १८८२: ऑस्कार वाइल्डने न्यूयॉर्कमध्ये इंग्लिश कलेचे पुनरुत्थान या विषयावर पहिले व्याख्यान दिले.
 • १९१५: महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले.
 • १९२२: प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले.
 • १९५१: न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांचे मुख्य कार्यालय सुरू झाले.
 • १९६४: अमेरिकेच्या ताब्यातील पनामा कालव्यावर पनामाचा ध्वज फडकावण्यावरून दंगल.
 • १९६६: भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे करार झाला.
 • १९८०: आणीबाणीनंतर इंदिरा गांधीं विक्रमी मतं मिळवून सत्तेवर.
 • १९९०: पिसा कलता मनोरा पर्यटकांसाठी बंद झाला.
 • २००१: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला
 • २००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.
 • २००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.
 • २००३: जमिनीवरुन जमिनीवर मारा करु शकणार्‍या 'अग्नी १ 'या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओरिसामधील बालासोर येथे यशस्वी चाचणी
 • २००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.
 • २०१५: व्हिस्टारा ह्या भारतीय प्रवासी विमानकंपनीच्या कार्यास सुरूवात.
जन्म / वाढदिवस
 • १६२४: मैशो, जपानी सम्राज्ञी.
 • १८५९: जेम्स क्रॅन्स्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८८९: लेखक आणि नाटककार वृंदावनलाल वर्मा.
 • १९१८: मार्क्सवादी विचारवंत लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे.
 • १९१८: मार्क्सवादी विचारवंत लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे
 • १९२२: हरगोविंद खुराना, नोबेल पुरस्कृत भारतीयवंशी जैव-रसायनशास्त्रज्ञ.
 • १९२६: कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
 • १९२७: रा. भा. पाटणकर, सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक, समीक्षक.
 • १९३४: महेंद्र कपूर, भारतीय पार्श्वगायक.
 • १९३८: चक्रवर्ती रामानुजम, भारतीय गणितज्ञ.
 • १९४६: इतिहासकार मोहम्मद इशाक खान
 • १९५१: पं. सत्यशील देशपांडे, ख्यालगायक, पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य.
 • १९६५: फराह खान, भारतीय नृत्यदिग्दर्शक.
 • १९७४: फरहान अख्तर, अभिनेता, दिग्दर्शक, गायक.
 • १९८३: शरद मल्होत्रा, अभिनेता.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • ८४८: कॅरॉलीन हर्शेल, खगोलशास्त्रज्ञ.
 • १८७३: नेपोलियन तिसरा, फ्रेंच सम्राट.
 • १९२३: सत्येंद्रनाथ टागोर, पहिले भारतीय सनदी अधिकारी (आयसीएस).
 • १९९८: केनिची फुकुई, नोबेल पारितोषिक विजेता जपानी रसायनशास्त्रज्ञ.
 • २००३: कमर जलालाबादी, कवी.
 • २००४: शंकरबापू आपेगावकर, राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक.
 • २०१३: जेम्स बुकॅनन, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.