१० जानेवारी दिनविशेष

१० जानेवारी दिनविशेष - [10 January in History] दिनांक १० जानेवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१० जानेवारी दिनविशेष | 10 January in History

दिनांक १० जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


शनिवारवाडा - शनिवारवाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.च्या १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते. शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. त्या दिवशी शनिवार होता म्हणून त्यास शनिवारवाडा असे नाव पडले.


जागतिक दिवस
 • मार्गारेट थॅचर दिन: फॉकलंड द्वीप.
 • वर्धापनदिन: मुंबईचे छत्रपती शिवाजी संग्रहालय (१९२२)
 • जागतिक हास्य दिन.
ठळक घटना / घडामोडी
 • ४९: ज्युलियस सीझरने रुबिकोन नदी ओलांडली. इटलीतील गृहयुद्ध सुरू.
 • १६६६: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.
 • १७३०: पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.
 • १७६०: 'बचेंगे तो और भी लडेंगे' या वाक्याने प्रसिद्ध असलेली दत्ताजी शिंदे वि. कुतुबशहा लढाई.
 • १८१०: नेपोलियन बोनापार्ट व जोसेफिन दि बोहार्नेचे लग्न मोडले.
 • १८६३: लंडनमधील भुयारी रेल्वे पॅडिंग्टन व फॅरिंग्डन स्ट्रीट या स्थानकांमध्ये सुरू.चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.
 • १८७०: बॉम्बे, बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (B. B. C. I. Railway) या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीचे चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता.
 • १९२०: लीग ऑफ नेशन्सने आपल्या पहिल्या बैठकीत व्हर्सायच्या तहाला मान्यता दिली.
 • १९२६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
 • १९२९: टिनटिनची चित्रकथा पहिल्यांदा प्रकाशित.
 • १९६६: भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
 • १९७२: शेख मुजीबुर रेहमान हे पाकिस्तानच्या कारावासातून ९ महिन्यानंतर सुटून बांगलादेश मध्ये नवीन राष्ट्रपती म्हणून परतले.
 • १९९९: संजीव नंदा (माजी नौदलप्रमुखाचा नातू) नवी दिल्लीत गाडी चालवताना तीन पोलिसांची चिरडून हत्या केली
 • २००१: विकिपिडीया न्यूपिडीयाचा एक भाग म्हणून सुरू झाला. पाच दिवसांनी त्याचे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण झाले.
जन्म / वाढदिवस
 • १७७५: दुसरे बाजीराव पेशवे.
 • १८१५: सर जॉन अलेक्झांडर मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पहिला पंतप्रधान.
 • १८९४: कवी पिंगली लक्ष्मीकांतम
 • १८९६: काकासाहेब तथा नरहर विष्णु गाडगीळ, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी साहित्यिक, वक्ता.
 • १८९६: वास्तुसंग्राहक दिनकर गंगाधर केळकर
 • १९००: मारोतराव सांबशिव कन्नमवार, महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३)
 • १९०१: डॉ. गणेश हरी खरे, इतिहास संशोधक.
 • १९०२: शिवराम कारंथ, कन्नड साहित्यिक.
 • १९१९: श्री. र. भिडे, संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक.
 • १९२७: शिवाजी गणेशन, तमिळ चित्रपट अभिनेता.
 • १९३८: डोनाल्ड क्नुथ, अमेरिकन गणितज्ञ व संगणकशास्त्रज्ञ.
 • १९४०: येशु दास, भारतीय पार्श्वगायक.
 • १९४९: अलू अरविंद, चित्रपट निर्माता.
 • १९५०: नाजुबाई गावित, आदिवासींसाठी आयुष्य वेचणार्‍या.
 • १९६६: मुरली नायर, दिग्दर्शक आणि पटकथालेखन.
 • १९७४: ॠतिक रोशन, भारतीय चित्रपट अभिनेता.
 • १९७५: जेम्स कर्टली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९८१: जेहान मुबारक, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १२७६: पोप ग्रेगोरी दहावा.
 • १७६०: दत्ताजी शिंदे, पानिपतच्या पहिल्या युद्धातील मराठा सरदार.
 • १८६२: सॅम्युएल कोल्ट, अमेरिकन संशोधक.
 • १९९९: आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर, स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत.
 • १९६६: लालबहादूर शास्त्री, भारताचे पंतप्रधान.
 • १९९९: आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक व समाजवादी विचारवंत.
 • २००२: पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी.आर. व्यास, ख्यालगायक व बंदिशकार.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.