३ जानेवारीचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक ३ जानेवारीचा इतिहास.
सावित्रीबाई फुले - (३ जानेवारी १८३१ - १० मार्च १८९७) पहिल्या महिला मराठी मुख्याध्यापिका, शिक्षिका, समाजसुधारक होत्या. सावित्रीबाई फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा पुणे येथील भिडे वाड्यात सुरू केली.
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / जानेवारी महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
शेवटचा बदल ३ जानेवारी २०२५
जागतिक दिवस / दिनविशेष
३ जानेवारी रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- ऑक्युपेशन थेरपी दिन.
- बालिका दिन (सावित्रीबाई फुले जन्म दिन).
- महिला मुक्तिदिन.
- मूलभूत कर्तव्यपालन दिन.
- वर्धापनदिन: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे.
३ जानेवारीचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)
३ जानेवारीचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी- १४९६: लिओनार्डो दा विन्चीने उड्डाणयंत्राचा एक असफल प्रयोग केला.
- १५२१: पोप लिओ दहाव्याने पोपचा फतवा काढून मार्टिन ल्यूथरला वाळीत टाकले.
- १८५५: हवाईमध्ये चीनी नागरिकांचे प्रथम आगमन.
- १८६१: अमेरिकन यादवी युद्ध - डेलावेरने संयुक्त संस्थानातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला.
- १८६८: जपानमध्ये शोगन सत्ता संपली. मैजी वंश पुन्हा राज्यकर्ता.
- १९२१: तुर्कस्तानने आर्मेनियाशी संधी केली.
- १९२५: बेनितो मुसोलिनीने इटलीत हुकुमशाही जाहीर केली.
- १९३१: महात्मा गांधीनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी गोलमेज परिषदेत केली .
- १९४७: अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.
- १९५०: पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उदघाटन.
- १९५२: स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका.
- १९५७: हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले विद्युत घटांवर चालणारे पहिले मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
- १९५८: सर एडमंड हिलरी हे दक्षिण ध्रुवावर पोहोचले.
- १९६१: अमेरिकेने क्युबाशी संबंध तोडले.
- २००४: ईजिप्तच्या फ्लॅश एरलाइन्स फ्लाइट ६०४ हे बोईंग ७३७ प्रकारचे विमान लाल समुद्रात कोसळले. १४८ ठार.
- २००४: नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
जन्म (वाढदिवस, जयंती)
३ जानेवारी रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १०६: सिसेरो, रोमन राजकारणी.
- १८३१: सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी.
- १८८८: कागदी स्ट्रॉचा वापर सुरू.
- १८९२: जे. आर. आर. टोकियेन, ब्रिटीश लेखक व भाषाशास्त्री, लॉर्ड ऑफ द रिंग्ज या पुस्तकत्रयीचा लेखक.
- १९१७: कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक.
- १९२१: चेतन आनंद, हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक.
- १९२२: चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक.
- १९३१: यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
३ जानेवारी रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १३२२: फिलिप पाचवा, फ्रांसचा राजा.
- १९७२: नाटककार मोहन राकेश.
- १९७५: ललित नारायण मिश्रा, भारतीय रेल्वेमंत्री, राजकारणी. बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन.
- १९८२: अब्राहम डेव्हिड, भारतीय अभिनेता.
- १९९४: अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार लेखक.
- १९९८: केशव विष्णू बेलसरे, तथा “बाबा” बेलसरे , मराठी तत्त्वज्ञानी, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य.
- २०००: डॉ. सुशीला नायर, स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे.
- २००२: सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ.
- २००५: जे.एन.दिक्षित, भारतीय राजकारणी.
- २०१३: व्हायोलिनवादक एम. एस. गोपालकृष्णन.
- २०१५: लेखिका सरिता पदकी.
३ जानेवारीचा इतिहास यासंबंधी महत्त्वाचे दुवे:
जानेवारी महिन्याचा इतिहास | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे जानेवारी महिन्यातील सर्व इतिहास पहा. |
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / जानेवारी महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
Shekhar
हटवा