दिनांक २७ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ - (स्थापना - २७ जानेवारी १९६७) ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत स्थापन केलेली आहे. महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमासंबंधी संशोधन करणे, त्यानुसार शालेय अभ्यासक्रम तयार करणे, या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करणे आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी व योग्य दरात तसेच वेळेवर पुस्तके उपलब्ध व्हावीत अशा पद्धतीने मुद्रण आणि वितरणाची व्यवस्था करणे ही कार्ये ही संस्था करते. संस्थेचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. तसेच औरंगाबाद आणि नागपूर येथे संस्थेची विभागीय कार्यालये आहेत. ‘बालभारती’ या नावानेही ती ओळखली जाते.
जागतिक दिवस
- ज्यू स्मृति दिन: भारत.
- १८२५: अमेरिकन काँग्रेसने आत्ताच्या ओक्लाहोमा राज्याच्या प्रदेशात ईंडियन प्रभाग तयार केला. यानंतर पूर्व अमेरिकेतील मूळ निवासींना येथे जाण्यास भाग पाडले. याला अश्रूंची वाट हे नाव दिले गेले.
- १८८०: थॉमस अल्वा एडिसनने विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतला.
- १८८८: नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची वॉशिंग्टन डी.सी येथे स्थापना.
- १९२६: जॉन लोगीबेअर्डने प्रथमतः टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले.
- १९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे शालेय अभ्यासक्रम तयार करणारे मंडळ स्थापन करण्यात आले.
- १९८३: जगातील सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा (५३.९०० किमी)जपानच्या होन्शू व होक्काइदो बेटांमध्ये खुला.
- १९२४: साबु दस्तगीर, भारतीय अभिनेता.
- १९६७: बॉबी देओल, भारतीय अभिनेता.
- १९७४: चमिंडा वास, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १४९०: अशिकागा योशिमासा, जपानी शोगन.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |