दिनांक ३१ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे - (३१ जानेवारी १८९६ - २१ ऑक्टोबर १९८१) हे कन्नड भाषेतील ख्यातनाम कवी होते. ते अंबिकातनयदत्त (अंबिकेचा पुत्र - दत्त) या टोपणनावाने लिहीत. कन्नड कविता व नाटकांशिवाय त्यानी मराठी साहित्यकृतींचे कन्नड भाषेत अनुवादही केले. नवोदय युगातील कन्नड काव्यातले त्यांचे योगदान पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९६८) व ज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. १९७४) देऊन गौरवण्यात आले.
जागतिक दिवस
- स्वातंत्र्य दिन - नौरू.
- १९१५: पहिले महायुद्ध- जर्मनीने रशियाच्या सैन्याविरुद्ध विषारी वायुचा उपयोग केला.
- १९२०: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला.
- १९५०: राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.
- १९५८: अमेरिकेच्या पहिला कृत्रिम उपग्रह एक्स्प्लोरर १ ने पृथ्वीप्रदक्षिणा सुरू केली.
- १९७१: अपोलो १४ चंद्राकडे निघाले.
- १८९६: दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड महाकवी.
- १९३१: गंगाधर महांबरे, ज्येष्ठ संगीतकार
- १९७५: प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९७२: महेंद्र नेपाळचा राजा.
- १९९४: वसंत जोगळेकर, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.
- २०००: के. एन. सिंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते.
- २००४: सुरैय्या, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री.
- २००६: कोरेटा स्कॉट किंग, मार्टिन ल्युथर किंगची पत्नी.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |