७ जानेवारी दिनविशेष

७ जानेवारी दिनविशेष - [7 January in History] दिनांक ७ जानेवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
सुप्रिया पाठक | Supriya Pathak

दिनांक ७ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


सुप्रिया पाठक - (७ जानेवारी १९६१) भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहेत. ह्यांनी मासूम, सरकार, सरकार राज, वेक अप सिड सह अनेक चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून काम केलेले आहे. हिंदीसोबत मराठी भाषांमध्येही यांनी काम केले आहे. सुप्रिया पाठक यांना तीन फिल्मफेअर पुरस्कार सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.


जागतिक दिवस
 • -
ठळक घटना / घडामोडी
 • १७८९: अमेरिकेतील राष्ट्रध्यक्षपदाच्या पहिल्या निवडणूकीत जॉर्ज वॉशिंग्टन विजयी.
 • १६१०: गुरूचे आयो,युरोपा,गॅनिमीड व कॅलिस्टो हे चार चंद्र गॅलिलिओ ने दुर्बिणीद्वारे शोधले.
 • १६८०: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.
 • १७८९: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन त्यान जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले.
 • १९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतनाम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.
 • १९२७: न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
 • १९३५: कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमीचे (INSA) उद्‌घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.
 • १९६८: अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.
 • १९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
 • १९७८: एम.व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्‍यांसह होनोलुलूजवळील महासागरात बेपत्ता झाली.
 • १९८०: आणीबाणीनंतरच्या पराभवानंतर इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने पुन्हा विजयी झाल्या व केंद्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.
 • १९८८: विश्वनाथन आनंदला बुद्धिबळात ग्रँडमास्टर दर्जा प्राप्त झाला. यथावकाश त्याने अनेकदा विश्वविजेतेपद जिंकले.
 • २००१: २१० मेगावॉटचा प्रकल्प खापरखेडा औष्णिक केंद्राकडून ४० महिन्यांत पूर्ण.
 • २००३: पी. हरिकृष्ण या पंधरा वर्षाच्या भारतीय ग्रँडमास्टरने के. शशिकिरण व अलेक्सी बार्सोव यांच्याबरोबर हेस्टिंग्ज येथील जागतिक स्पर्धेत संयुक्त विजेतेपद मिळविले.
 • २०१५: पॅरिसमध्ये 'शार्ली एब्दो' ह्या उपरोधिक नियतकालिकावर दहशतवादी हल्ला; संपादक व प्रमुख व्यंगचित्रकारांसह १२ मृत.
जन्म / वाढदिवस
 • १७८९: आइल्हार्ड मिट्शेर्लिख, रसायनशास्त्रज्ञ. बेंझिन व मिथिल या रसायनांचा शोधक.
 • १८२७: सर सँडफोर्ड फ्लेमिंग, केनेडियन अभियंता.
 • १८८५: नाटककार माधव नारायण जोशी.
 • १८९३: जानकीदेवी बजाज, भारतीय स्वातंत्र्यसेनानी.
 • १९२०: सरोजिनी बाबर, लोकसाहित्याच्या अभ्यासक. लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी.
 • १९२१: चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता.
 • १९४५: रैला ओडिंगा, केन्याचा पंतप्रधान.
 • १९४८: शोभा डे, भारतीय लेखिका.
 • १९५०: जॉनी लिव्हर, भारतीय अभिनेता.
 • १९६१: सुप्रिया पाठक, अभिनेत्री.
 • १९७९: बिपाशा बासू, भारतीय चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १९८९: मिचियोमिया हिरोहितो, जपानचे सम्राट.
 • २०००: डॉ. अच्युतराव आपटे, विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.