दिनांक ११ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
लालबहादूर शास्त्री - (२ ऑक्टोबर १९०४ - ११ जानेवारी १९६६) लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात १९६५ सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले.
जागतिक दिवस
- प्रजासत्ताक दिन: आल्बेनिया.
- एकता दिन: नेपाळ.
- स्वतंत्रता संघर्ष दिन: मोरोक्को.
- स्वतंत्रता संघर्ष दिन: मोरोक्को.
- ११५८: व्लादिस्लाव दुसरा बोहेमियाच्या राजेपदी.
- १६९३: सिसिलीमध्ये माउंट एटना या ज्वालामुखीचा उद्रेक.
- १७८७: विल्यम हर्शलने टायटेनिया व ओबेरोन या युरेनसच्या उपग्रहांचा शोध लावला.
- १८६३: अमेरिकन यादवी युद्ध-आर्कान्सा पोस्टची लढाई- उत्तरेच्या जॉन मॅकक्लेर्नान्ड व डेव्हिड पोर्टर या सेनापतींनी आर्कान्सा नदीवर उत्तरेचे वर्चस्व प्रस्थापित केले.
- १९१६: नेल्सन मंडेला यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
- १९२२: मधुमेहाच्या रुग्णावर प्रथमतः इन्सुलिनचा प्रयोग केला गेला.
- १९३५: श्वेतबटू ताऱ्यांच्या वस्तुमान मर्यादेवरून चंद्रशेखर आणि एडिंग्टन यांचा वाद. (पुढे चंद्रशेखरना याच शोधासाठी नोबेल)
- १९४९: लॉस ऍंजेलसमध्ये पहिल्यांदा हिमवर्षाव झाला.
- १९५५: नेपानगरमध्ये पहिला भारतीय कागद कारखाना सुरू झाला.
- १९६६: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
- १९७२: बांगलादेश मुक्ति युद्धात पाकिस्तानचा सपशेल पराभव. पूर्व पाकिस्तानातून बांगलादेशची निर्मिती.
- १९९९: कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी.
- २०००: छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना
- २००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- २००२: अल्झायमर विकाराचे वेळेत निदान करणारी पहिली चाचणी कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजलिस (UCLA) यांनी जाहीर केली.
- १७५५: अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा पहिला खजिनदार.
- १८१५: जॉन ए. मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पहिला पंतप्रधान.
- १८५८: श्रीधर पाठक, हिंदी साहित्यिक.
- १८९८: विष्णू सखाराम खांडेकर, मराठी साहित्यिक.
- १९०६: आल्बर्ट हॉफमन, स्वित्झर्लंडचा रसायनशास्त्रज्ञ.
- १९४४: शिबू सोरेन, भारतीय राजकारणी.
- १९५४: बोनी कपूर, हिंदी चित्रपट दिग्दर्शक.
- १९५५: आशा खाडिलकर, उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका
- १९७१: सजीव डिसिल्वा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७३: राहुल द्रविड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२१: वासुदेवाचार्य केसर, कन्नड साहित्यिक.
- १९२८: थॉमस हार्डी, इंग्रजी कादंबरीकार.
- १९३४: क्रांतीकारक मास्टर सूर्यसेन यांना चित्तगाव येथे फाशी देण्यात आली
- १९५४: सर जॉन सायमन, सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष.
- १९६६: लालबहादूर शास्त्री, भारताचे पंतप्रधान यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते.
- १९८३: घनश्यामदास बिरला, भारतीय उद्योगपती.
- १९९७: भबतोष दत्ता, अर्थतज्ञ.
- २००८: यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.
- २००८: सर एडमंड हिलरी, माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |