दिनांक १३ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
मिकी माउस - मिकी माउस हे वॉल्ट डिस्नी याने इ.स. १९२८ साली निर्मित केलेले एक जगप्रसिद्ध व्यंगचित्र (कार्टून) आहे.
जागतिक दिवस
- केप वेर्देचा लोकशाही दिन.
- स्वातंत्र्यदिन: टोगो
- १५५९: एलिझाबेथ पहिली इंग्लंडच्या राणीपदी.
- १६१०: गॅलिलियोने गुरूचा चौथा उपग्रह, कॅलिस्टोचा शोध लावला.
- १८४२: काबुलमधुन माघार घेणार्या ब्रिटीश-भारतीय सैन्याच्या १६,५०० सैनिक व असैनिकांपैकी असिस्टंट सर्जन विल्यम ब्रायडन हा एकमेव जिवंत व्यक्ती जलालाबादला पोचला.
- १८४९: इंग्रज आणि शीखांची दुसरी लढाई, चिलीयनवाला इथे सुरू झाली. (शीखांचा विजय)
- १८९९: गोविंद बल्लाळ देवल यांच्या संगीत शारदा या नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.
- १९३०: मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.
- १९४२: अमेरिकेने जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात पाठविण्यास सुरूवात केली.
- १९५७: हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले.
- १९६४: कोलकाता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार
- १९६७: पुण्यातील स. प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.
- १९९६: पुणे मुंबई शताब्दी एक्सप्रेस सुरू झाली.
- २००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- २०११: भारतातील शेवटची पोलिओ रुग्ण सापडली.
- १५९६: यान फान गोयॉ, डच चित्रकार.
- १८९६: मनोरमा रानडे, रविकिरण मंडळातल्या कवयित्री.
- १९१९: एम. चेन्ना रेड्डी, आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९७४ - १९७७), पंजाबचे राज्यपाल (१९८२ - १९८३), राजस्थानचे राज्यपाल (१९९२ - १९९३), तामिळनाडूचे राज्यपाल (१९९३ - १९९६).
- १९२६: शक्ती सामंत, हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते.
- १९३८: पं. शिवकुमार शर्मा, संतूरवादक व संगीतकार
- १९४८: गज सिंघ, जोधपूरचा राजा.
- १९४९: राकेश शर्मा, एकूण १३८ वा व पहिला भारतीय अंतराळवीर.
- १९८३: इम्रान खान, भारतीय चित्रपट अभिनेता.
- ८८८: जाड्या चार्ल्स, पवित्र रोमन सम्राट.
- १८३२: थॉमस लॉर्ड, लॉर्ड्स क्रिकेट मैदानाचे संस्थापक.
- १९२६: मनोरमा रानडे, कवयित्री.
- १९७६: अहमद जाँ थिरकवा, तबला वादक.
- १९८५: मदन पुरी, हिंदी व पंजाबी चित्रपट अभिनेता.
- १९९७: शंभू सेन, भारतीय संगीत व नृत्य दिग्दर्शक.
- १९९७: मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे, उद्योजक व वेदाभ्यासक.
- २००१: श्रीधर गणेश दाढे, संस्कृतपंडित व लेखक.
- २०११: प्रभाकर पणशीकर, मराठी अभिनेता.
- २०१३: रुसी सुरती, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |