४ जानेवारी दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ४ जानेवारी चे दिनविशेष.

दिनांक ४ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
आयझॅक न्यूटन - (४ जानेवारी १६४३ - ३१ मार्च १७२७) एक भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते.
जागतिक दिवस
- आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन.
- स्वातंत्र्यदिन: म्यानमार (१९४८)
- ८७१: रीडिंगची लढाई- वेसेक्सचा एथेलरेड डेन्मार्कच्या आक्रमकांकडून पराभूत.
- १४९३: क्रिस्टोफर कोलंबस आपल्या पहिल्या सफरीच्या अंती नव्या जगातून परत निघाला.
- १६४२: इंग्लिश गृहयुद्ध- चार्ल्स पहिल्याने ब्रिटीश संसदेवर हल्ला केला.
- १७१७: नेदरलँड्स, इंग्लंड व फ्रांसने तिहेरी तह केला.
- १७६२: इंग्लंडने स्पेन व नेपल्स विरूद्ध युद्ध पुकारले.
- १८८१: लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले.
- १८८५: आंत्रपुच्छ (appendix) काढुन टाकण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. विल्यम डब्ल्यू. ग्रांट यांनी मेरी गार्टसाईड या रुग्णावर केली.
- १९२६: क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.
- १९५२: ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.
- १९५४: मेहेरचंद महाजन भारताच्या सरन्यायाधीशपदी.
- १९५८: स्पुतनिक १, पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर पडला.
- १९५८: एडमंड हिलरी दक्षिण ध्रुवावर पोहोचले.
- १९५९: रशियाचे अंतराळयान, लुना १, चंद्राच्या जवळ पोचले.
- १९६२: न्यूयॉर्कमध्ये चालकरहित रेल्वे सुरू झाली.
- १९६४: भारतातील पहिले डिझेल वाराणसी येथे तयार झाले.
- १९९०: पाकिस्तानच्या सिंध प्रांतात प्रवासी रेल्वे थाबलेल्या मालगाडीवर आदळली. ३०० ठार.
- १९९६: चंद्रकांत खोत यांच्या बिंब प्रतिबिंब या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा पुरस्कार.
- १९९६: कावेरीचे पाणी तामिळनाडू राज्याला सोडले.
- २००४: नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली.
- २००७: नान्सी पेलोसी अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्जची सभापती असणारी प्रथम स्त्री ठरली.
- २०१०: ’बुर्ज खलिफा’ या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्घाटन झाले.
- १६४३: सर आयझेक न्यूटन, इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी.
- १८०९: लुई ब्रेल दृष्टिहीनांसाठी 'ब्रेल लिपी' तयार करणारा.
- १८१३: आयझॅक पिट्समन लघुलिपी(शॉर्टहँड) तयार करणारा.
- १९००: जेम्स बाँड, अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ.
- १९०९: प्रभाकर पाध्ये, मराठी नवसाहित्यिक.
- १९१४: इंदिरा संत, मराठी कवयित्री.
- १९२४: विद्याधर गोखले, नाटककार, खासदार, लेखक संपादक.
- १९२५: प्रदीप कुमार, हिंदी व बंगाली चित्रपट अभिनेता.
- १९३७: सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४०: श्रीकांत सिनकर, मराठी कादंबरीकार.
- १९४१: कल्पनाथ राय, केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते.
- १२४८: सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १८३१: जेम्स मन्रो, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
- १८५१: दुसरे बाजीराव पेशवे कानपूरजवळ ब्रह्मावर्त येथे निधन.
- १९०७: गोवर्धनराम त्रिपाठी, 'सरस्वतीचंद्र' या गुजराती कादंबरीचे लेखक.
- १९०८: राजारामशास्त्री भागवत, विचारवंत व संस्कृत पंडित. विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दूधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते.
- १९९४: राहुल देव बर्मन तथा ’पंचमदा’, संगीतकार
जानेवारी महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे जानेवारी महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर