२६ जानेवारी दिनविशेष

२६ जानेवारी दिनविशेष - [26 January in History] दिनांक २६ जानेवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२६ जानेवारी दिनविशेष | 26 January in History

दिनांक २६ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


भारतीय प्रजासत्ताक दिन - भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी २६ या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.


जागतिक दिवस
ठळक घटना / घडामोडी
 • १५००: व्हिसेन्ते यानेझ पिन्झोन ब्राझिलला पोचणारा पहिला युरोपीय ठरला.
 • १८३७: मिशिगन अमेरिकेचे २६वे राज्य झाले.
 • १८४१: युनायटेड किंग्डमने चीनकडून हाँग काँगचा ताबा घेतला.
 • १९०५: दक्षिण आफ्रिकेत प्रिटोरिया जवळच्या खाणीत कलिनन हिरा सापडला.
 • १९३०: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने २६ जानेवारी हा पूर्ण स्वराज्य दिन असल्याचे जाहीर केले. वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून काँग्रेसने २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सुरुवात केली.
 • १९३३: स्वातंत्र्यदिन साजरा केल्याने देशात धरपकड.
 • १९४९: भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.
 • १९५०: भारत प्रजासत्ताक देश झाला. डॉ. राजेन्द्रप्रसाद राष्ट्रपतिपदी.
 • १९६५: भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.
 • २००१: गुजरातमध्ये भूकंप. २०,००० ठार.
 • २०१३: कोट दि आईव्होरच्या आबिजान शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होउन ६० व्यक्ती ठार, २०० जखमी.
 • २०१८: प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान, इलायाराजा (संगीत) आणि परमेश्वरन (साहित्य आणि शिक्षण) यांना पद्मविभूषण तर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व बिलियर्डपटू पंकज अडवाणीला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
जन्म / वाढदिवस
 • १८५७: दलाई लामा, बारावा अवतार.
 • १९१५: राणी गायडिनलू, ईशान्य भारतातील वीरांगना. 'राणी' ही पदवी त्यांना नेहरूंनी दिली. त्यांच्या स्मरणार्थ स्त्री शक्ती पुरस्कार दिला जातो.
 • १९१९: खानमोहम्मद इब्राहीम, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९५७: शिवलाल यादव, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९५७: अशोक मल्होत्रा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १६३०: हेन्री ब्रिग्ज, लघुगणकसारिणी (लॉगॅरिदम टेबल्स) तयार करण्यात मोठा वाटा असणारा इंग्लिश गणितज्ञ.
 • २०१५: आर.के. लक्ष्मण, भारतीय व्यंगचित्रकार.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.