१९ जानेवारी दिनविशेष

१९ जानेवारी दिनविशेष - [19 January in History] दिनांक १९ जानेवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
ओशो रजनीश | Osho Rajneesh

दिनांक १९ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


ओशो रजनीश - (११ डिसेंबर १९३१ - १९ जानेवारी १९९०) चंद्र मोहन जैन हे जन्मनाव असणारे, १९६० पासून आचार्य रजनीश म्हणून, १९७० व १९८० च्या दशकांमध्ये भगवान श्री रजनीश म्हणून आणि १९८९ पासून ओशो म्हणून ओळखले जाणारे ओशो हे आंतरराष्ट्रीय अनुयायी मिळवणारे भारतीय रहस्यवादी, गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक होते.


जागतिक दिवस
 • -
ठळक घटना / घडामोडी
 • १८०६: इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होपचा ताबा घेतला.
 • १८३९: ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीने एडन जिंकले आणि भारत-इंग्लंड समुद्रीमार्ग चाच्यांपासून सुरक्षित केला.
 • १९४९: पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली.
 • १९५४: कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन
 • १९५६: देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकुम. त्यांचेच एकत्रित स्वरुपात आयुर्विमा महामंडळ झाले.
 • १९६६: इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी.
 • १९६८: डॉ. क्रिस्टोफर बर्नार्ड यांनी पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया केली.
 • १९८६: (c) Brain नावाचा पहिला संगणक विषाणु पसरण्यास सुरूवात झाली.
 • १९९६: ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांची शास्त्रीय संगीतासाठीच्या मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड. तसेच प्रसिद्ध मल्याळी लेखक एम.टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.
 • २००६: नासाने न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित केले.
 • २००६: जेट एरवेझने एर सहारा विकत घेतले व भारतातील सगळ्यात मोठी विमान कंपनी झाली.
 • २००७: सरदार सरोवर धरणावरील साडेचौदाशे मेगावॉट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला अर्पण केला.
जन्म / वाढदिवस
 • १७३६: जेम्स वॅट, स्कॉटिश शास्त्रज्ञ संशोधक.
 • १८८६: रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व, हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक.
 • १८९२: चिंतामण विनायक जोशी, विनोदी लेखक व पाली भाषेचे अभ्यासक.
 • १९०६: विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ मास्टर विनायक, मराठी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते. त्यांनी २२ चित्रपटातून भूमिका केल्या तर २९ चित्रपट दिग्दर्शित केले.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १९०५: देबेन्द्रनाथ टागोर, भारतीय तत्त्वज्ञानी.
 • १९५१: अमृतलाल विठ्ठल ठक्कर, महात्मा गांधींचे अनुयायी.
 • १९६०: रामचंद्र गोपाळ ऊर्फ दादासाहेब तोरणे, मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक.
 • १९९०: रजनीश, भारतीय तत्त्वज्ञानी.
 • २०००: मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम.ए. चिदंबरम, उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे अध्यक्ष; उपाध्यक्ष व खजिनदार, तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, चेन्नईचे महापौर.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.