उंच घ्यावी भरारी - मराठी कविता

उंच घ्यावी भरारी, मराठी कविता - [Unch Ghyavi Bharari, Marathi Kavita] वाटे मनास माझ्या, उंच घ्यावी भरारी, निळ्याभोर गगनात, स्पर्शुन यावे तरी.

वाटे मनास माझ्या, उंच घ्यावी भरारी, निळ्याभोर गगनात, स्पर्शुन यावे तरी

वाटे मनास माझ्या
उंच घ्यावी भरारी
निळ्याभोर गगनात
स्पर्शुन यावे तरी

निळ्या आकाशाला
जवळून पहावे
आणि त्या अंगणात
मीही लपून जावे

शोधशील का तू
मला तेथे येऊनी
तू दिसता क्षणी
येईल मी धावूनी


रजनी जोगळेकर | Rajani Jogalekar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.