२ जानेवारी दिनविशेष

२ जानेवारी दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २ जानेवारी चे दिनविशेष.
फर्ग्युसन महाविद्यालय - पुणे | Fergusson College - Pune

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २ जानेवारी चे दिनविशेष


फर्ग्युसन महाविद्यालय - (२ जानेवारी १९८५) फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. फर्ग्युसन महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना १८८५ साली लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली.


शेवटचा बदल २४ जानेवारी २०२२

जागतिक दिवस
२ जानेवारी रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
२ जानेवारी रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १७५७: ब्रिटीश ईस्ट ईंडीया कंपनीने कोलकाता काबीज केले.प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला
 • १८८१: लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या मराठा या दैनिकाची सुरूवात झाली.
 • १८८५: पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.
 • १९३६: मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना.
 • १९४२: दुसरे महायुद्ध- जपानने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जिंकली.
 • १९५४: राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ‘भारतरत्‍न’ पुरस्कारांची स्थापना केली.
 • १९५९: सोवियेत संघाने लुना १ या अंतराळयानाचे चंद्राकडे प्रक्षेपण केले.
 • १९८५: पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन.
 • १९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या.
 • १९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान.
 • २०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.
 • २०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.
 • २०१६: सौदी अरेबियाने दहशतवादी असल्याचे ठरवून ४६ लोकांना मृत्युदंड दिला.

जन्म / वाढदिवस / जयंती
२ जानेवारी रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १६४२: महमद चौथा, ऑट्टोमन सुलतान.
 • १९१०: श्रीरंगम श्रीनिवासराव, तेलुगू कवी.
 • १९३२: हरचंदसिंग लोंगोवाल, अकाली दलाचे अध्यक्ष.
 • १९४०: श्रीनिवास वरदन, भारतीय गणितज्ञ.
 • १९५९: किर्ती आझाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९६०: रमण लांबा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२ जानेवारी रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १३१६: अल्लाउद्दीन खिलजी, दिल्लीचा सुलतान.
 • १९३५: मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर, टिळक अनुयायी स्वातंत्र्यसैनिक, मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील.
 • १९४३: भाई कोतवाल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
 • १९४४: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे, मराठी समाजसुधारक.
 • १९५२: भास्कर वामन भट, भारतीय इतिहास संशोधक.
 • १९८९: सफदर हाश्मी, भारतीय पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवी आणि गीतकार.
 • १९९९: विमला फारुकी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या.
 • २००२: अनिल अग्रवाल, भारतीय पर्यावरणवादी.
 • २०१५: वसंत गोवारीकर, भारतीय शास्त्रज्ञ.

२ जानेवारी दिनविशेषदिनविशेष        जानेवारी महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.