१८ जानेवारी दिनविशेष

१८ जानेवारी दिनविशेष - [18 January in History] दिनांक १८ जानेवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
हरिवंशराय बच्चन | Harivansh Rai Bachchan

दिनांक १८ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


हरिवंशराय बच्चन - (२७ नोव्हेंबर १९०७ - १८ जानेवारी २००३) अलाहाबादच्या कायस्थ कुटुंबात जन्मलेल्या बच्चन यांचे खरे नाव हरिवंश श्रीवास्तव होते. त्यांना बालपणात बच्चन म्हणत, बच्चन याचा शाब्दिक अर्थ मूल किंवा संतती असा होतो. नंतर ते याच नावाने प्रसिद्ध झाले. त्यांनी प्रथम कायस्थ पाठशाळेमध्ये उर्दू भाषेचा अभ्यास केला ज्याला त्यावेळी कायद्याच्या पदवीपर्यंतची पहिली पायरी मानली जात असे. यानंतर त्यांनी प्रयाग विद्यापीठातून इंग्रजीत एम.ए केले आणि केंब्रिज विद्यापीठातून पी.एच.डी केली. मधुशाला हा त्यांचा प्रसिद्ध कविता संग्रह आहे.


जागतिक दिवस
 • -
ठळक घटना / घडामोडी
 • १७७८: कॅप्टन जेम्स कूक हवाईला पोचणारा पहिला युरोपियन ठरला. त्याने या द्वीपसमूहाचे नाव सॅन्डविच आयलंड्स असे ठेवले.
 • १८८६: इंग्लंडमध्ये हॉकी असोसिएशनची स्थापना. हॉकीच्या खेळाला प्रथमतः मान्यता.
 • १९११: युजीन बी. इलायने सान फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु.एस.एस.पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग.
 • १९१९: पहिले महायुद्ध- व्हर्साय येथे पहिली शांति परिषद सुरू झाली.
 • १९५६: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार. १० ठार, २५० जखमी, औद्योगिक विभागात दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू. मुंबईच्या पाच काँग्रेस आमदारांचा राजीनामा
 • १९६४: न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींचे भूमिपूजन.
 • १९९७: नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने व कोणाच्याही मदतीशिवाय अटलांटिक महासागर पार केला.
 • १९९९: नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.
 • २००५: एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमानाचे अनावरण करण्यात आले.
जन्म / वाढदिवस
 • १८४२: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, अर्थशास्त्रज्ञ,समाजसुधारक,राजनीतीज्ञ.
 • १८५४: थॉमस वॅट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस, पहिल्या दूरध्वनी संभाषणातील भागीदार.
 • १८८९: देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी.व्ही.जी., कन्नड कवी व विचारवंत
 • १८८९: शंकर काशिनाथ गर्गे तथा दिवाकर, मराठी साहित्यिक.
 • १८९५: विठठ्ल दत्तात्रय घाटे प्रसिद्ध लेखक
 • १९३३: रे डॉल्बी, अमेरिकन संशोधक.
 • १९५२: वीरप्पन, चंदन तस्कर.
 • १९७२: विनोद कांबळी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १९२७: कार्लोटा, मेक्सिकोची सम्राज्ञी.
 • १९३६: रूड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक.
 • १९४७: कुंदनलाल सैगल, भारतीय अभिनेता, गायक.
 • १९६७: डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक.
 • १९७१: बॅरिस्टर नाथ पै, भारतीय वकील, संसदसदस्य.
 • १९८६: प्राचार्य नारायण गोपाळ तवकर, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक.
 • १९९३: आत्माराम रावजी भट, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक.
 • १९९६: एन. टी. रामाराव, तेलगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्र प्रदेशचे १० वे मुख्यमंत्री.
 • २००३: हरिवंशराय बच्चन, हिंदी साहित्यिक.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.