तुझा रूसवा - मराठी कविता

तुझा रूसवा, मराठी कविता - [Tujha Rusawa, Marathi Kavita] नको रे रूसु तु माझ्यावरती, तुजवीण क्षण ही रहावेल का तरी.

नको रे रूसु तु माझ्यावरती, तुजवीण क्षण ही रहावेल का तरी

नको रे रूसु तु माझ्यावरती
तुजवीण क्षण ही रहावेल का तरी

तुझ्या बोलण्यात असे प्रीतीचा गोडवा
क्षणभर विसरून जा तुझा रूसवा

तुझा रूसवा कसा मी घालवू
कळेना सांग काय मी करू

चुकले जरी मी ही शिक्षा नको मला
माफ करशील ना माझ्या प्रीत फुला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.