छकुली माझी का बरं रूसली, आई आली तरी नाही हासली
छकुली माझी का बरं रूसलीआई आली तरी नाही हासली
कोणता खाऊ देऊ बाई सांग
कोणते खेळणे हवेतरी तुला
कसा मी रूसवा घालवू तुझा
सांग तरी छकूले एकदा मला
आई, माझे बाबा कधी गं येणार
फॉरेनची बाहुली मला कधी आणणार
बाहुलीला घेवून मिरवीन मी
शेजारच्या पिंकीला दाखवीन ती
पिंकी अन् मी भातुकली खेळू
तुम्हाला आम्ही जेवायला बोलवू