३० जानेवारी दिनविशेष

३० जानेवारी दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ३० जानेवारी चे दिनविशेष.
३० जानेवारी दिनविशेष | 30 January in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ३० जानेवारी चे दिनविशेष


मोहनदास करमचंद गांधी - (२ ऑक्टोबर १८६९ - ३० जानेवारी १९४८) भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. महात्मा या संस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ आहे ‘महान आत्मा’. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. ते सत्याग्रहाचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.

शेवटचा बदल ३० जानेवारी २०२२

जागतिक दिवस
३० जानेवारी रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • शहीद दिन - भारत.

ठळक घटना / घडामोडी
३० जानेवारी रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १९११: जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा.
 • १९१३: इंग्लंडच्या संसदेने आयरिश होमरूलचा ठराव नामंजूर केला.
 • १९३३: ऍडॉल्फ हिटलर जर्मनीच्या चान्सेलर(अध्यक्षपदी).
 • १९४८: नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला.
 • २००२: भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जाहीर.

जन्म / वाढदिवस / जयंती
३० जानेवारी रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९१०: चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी.
 • १९४२: डेव्हिड ब्राउन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९६१: रणजित मदुरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
३० जानेवारी रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९४८: महात्मा गांधी, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ.
 • १९४८: ऑर्व्हिल राइट, अमेरिकन विमानतंत्रज्ञ.
 • १९९६: गोविंदराव पटवर्धन, हार्मोनियम व ऑर्गन वादक.
 • २०००: आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर, मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते.
 • २००१: प्रा. वसंत कानेटकर, ज्येष्ठ नाटककार.
 • २००४: रमेश अणावकर, प्रसिद्ध गीतकार.
 • २०१८: उर्दूचे सुप्रसिद्ध शायर मोहम्मद अल्वीयांचं अहमदाबाद येथे निधन झाले. अल्वी हे आधुनिक शायर म्हणून प्रसिद्ध होते.

दिनविशेष        जानेवारी महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.