डोळ्याला इजा होतात - मराठी कविता

डोळ्याला इजा होतात, मराठी कविता - [Dolyala Ijaa Hotat, Marathi Kavita] हृदय आणि मन एकमेकांशीच भांडतात, हे प्रेमाचे ऋतू किती लवकर संपतात.

हृदय आणि मन एकमेकांशीच भांडतात, हे प्रेमाचे ऋतू किती लवकर संपतात

हृदय आणि मन एकमेकांशीच भांडतात
हे प्रेमाचे ऋतू किती लवकर संपतात
आणि
आता तुझ्याच आठवणीत अश्रूंनी डोळ्याला इजा होतात

दिवस तुझ्या आठवणीत आणि रात्र तुझ्याच स्वप्नात रमतात
मनातील भावना तुला शोधायला प्रेमाच्या शहरात निघतात
आणि
आता तुझ्याच आठवणीत अश्रूंनी डोळ्याला इजा होतात

आपले दूर रहाणेच प्रेमाची पक्की गाठ बांधतात
कविता करीत असताना प्रेमाच्या शाहीतून तुझंच नाव निघतात
आणि
आता तुझ्याच आठवणीत अश्रूंनी डोळ्याला इजा होतात

डोळ्यातील बाहूली तुझाच चेहरा शोधतात
तुझ्या एका झलकाची डोळे मात्र वाट पाहतात
आणि
आता तुझ्याच आठवणीत अश्रूंनी डोळ्याला इजा होतात

प्रेमाचे क्षण हे प्रत्येकाच्या नशिबात का नसतात?
असतात तर मग हे क्षण दूर का जातात?
आणि
आता तुझ्याच आठवणीत अश्रूंनी डोळ्याला इजा होतात

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.