Loading ...
/* Dont copy */

नात्यांची खरी ओळख - मराठी कविता (चैताली गिते)

नात्यांची खरी ओळख - मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद कवयित्री श्रीमती चैताली गिते यांची नात्यांची खरी ओळख ही मराठी कविता.

नात्यांची खरी ओळख - मराठी कविता (श्रीमती चैताली गिते)

नात्यांच्या सूक्ष्म भावविश्वात डोकावत त्यांची खरी किंमत आणि जपणुकीचे महत्त्व उलगडणारी कविता...

नात्यांची खरी ओळख

श्रीमती चैताली गिते (मराठा हायस्कूल, नाशिक)

कविता नात्यांची ओळख ही अनुभवातूनच घडते, हे ठळकपणे मांडते. प्रामाणिकतेचा ऱ्हास आणि नावापुरती उरलेली नाती यावर कवी संवेदनशील भाष्य करतो. नाते म्हणजे आधार देणारी रेषा आणि तुटल्यास आयुष्य विस्कटणारी सीमारेषा ही प्रतिमा प्रभावी ठरते. माफी, शांतता आणि विश्वास यांना नात्यांच्या जपणुकीचे मूलभूत आधार मानले आहे. अपूर्णतेचा स्वीकार करून जपलेले नातेच आयुष्य घडवते, हा कवितेचा केंद्रबिंदू आहे.

नात्यांची खरी ओळख तेव्हाच कळते, जेव्हा आपण एखाद्या नात्यात अडकतो... नकळत त्या नात्यात वाहत जातो... प्रामाणिक नात्यांची किंमत जगात आता राहिली नाही... नावापुरती नाती आणि नावापुरतीच ओळख आता शिल्लक राहिली आहे... नाते म्हणजे शब्दांत न मावणारी आणि हळूच आयुष्याला धरून ठेवणारी रेषा... पण तुटली, तर सगळेच विस्कटून जाणारी सीमारेषा... चुकांनंतरही जपले जाते ते नाते आयुष्य घडवते... कधी माफीच्या एका शब्दात, कधी शांततेच्या क्षणात, नाते स्वतःला हरवून दुसऱ्याला जपण्याचे धैर्य शिकवते. तुझं आणि माझं नातं मुळी काही वेगळं नसतंच... जे असतं ते दोघांचं असतं, आणि तेच प्रेमाने आयुष्यभर जपायचं असतं... जपलेलं नातं प्रेमाने सावरायचं असतं, कधी चुकलो तर सांभाळून घ्यायचं असतं... विश्वासाच्या साच्यात अडकलेली असतात नाती, म्हणून नात्यात विश्वास जपला पाहिजे, एकमेकांवर नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे... नाते म्हणजे परिपूर्णता नव्हे, तर अपूर्णतेचा स्वीकार असतो. चुकांनंतरही जपले जाणारे तेच नाते आयुष्य घडवते... कधी माफीच्या एका शब्दात, कधी शांततेच्या क्षणात, नाते स्वतःला हरवून दुसऱ्याला जपण्याचे धैर्य शिकवते... आयुष्यात नात्याची किंमत त्यालाच कळते, ज्याने असंख्य नाती गमावलेली असतात... म्हणून आयुष्यात जेवढी नाती आहेत, तेवढी जपावीत आणि नात्यांना सावरत आयुष्य सुंदर करावे...

श्रीमती चैताली गिते यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची