७ फेब्रुवारी दिनविशेष

७ फेब्रुवारी दिनविशेष - [7 February in History] दिनांक ७ फेब्रुवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
७ फेब्रुवारी दिनविशेष | 7 February in History

दिनांक ७ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


रमाकांत आचरेकर - (१९३२ - २ जानेवारी २०१९) मराठी क्रिकेट प्रशिक्षक होते. भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचे मार्गदर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. फेब्रुवारी ७ २००३ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला.


जागतिक दिवस
 • स्वातंत्र्य दिन: ग्रेनेडा.
ठळक घटना / घडामोडी
 • १७८९: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले.
 • १९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरून १८ महिन्याची शिक्षा झाली
 • १९३५: कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे उदघाटन
 • १९७१: स्वित्झर्लंडमध्ये स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार दिला गेला.
 • १९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे काम पूर्ण
 • १९७७: सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
 • १९७९: प्लुटो नेपच्यून पेक्षा सूर्याच्या जवळ.
 • १९९५: इ.स. १९९३च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याच्या सूत्रधार राम्झी युसुफला पाकिस्तानात इस्लामाबाद येथे अटक.
 • २००३: महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शक रमाकांत आचरेकर यांना जाहीर.
जन्म / वाढदिवस
 • १८९३: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज
 • १९२०: संतसाहित्याच्या अभ्यासिका सरोजिनी बाबरे
 • १९२१: अभिनेते चंद्रकांत गोखले
 • १९२९: नाटककार, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर.
 • १९३८: एस. रामचंद्रन पिल्ले, भारतीय कम्युनिस्ट पक्षातील नेता.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १९९९: हुसेन, जॉर्डनचा राजा.
 • २०००: विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक डॉ. अच्युतराव आपटे
 • २००३: जीवनराव सावंत, ज्येष्ठ कामगार नेते.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.