दिनांक १२ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
अब्राहम लिंकन - (१२ फेब्रुवारी १८०९ - १५ एप्रिल १८६५) अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होते तर रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणारे पहिले राष्ट्राध्यक्ष होते.
जागतिक दिवस
- डार्विन दिन
- १९७६: पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.
- १९९९: संगीत क्षेत्रातील असाधारण स्वरुपाच्या कामगिरीबद्दल ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांना टोरोंटो विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे डिस्टिंग्विश्ड व्हिजिटर ऍवॉर्ड जाहीर.
- २००३: आवाजापेक्षा दुप्पट वेगाने स्वनातीत जाणाऱ्या जहाजविरोधी ब्राह्मोस क्षेपणास्त्राची ओरिसाच्या किनाऱ्यापासून दूरवर खोल बंगालच्या उपसागरात यशस्वी चाचणी घेण्यात आली.
- १७४२: नाना फडणवीस, पेशवाईतील नामवंत मुत्सद्दी.
- १८०९: अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा १६वा राष्ट्राध्यक्ष.
- १८०९: चार्ल्स डार्विन, उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडणारे.
- १९४९: गुंडप्पा विश्वनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७२: दुलिप समरवीरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १७९४: महादजी शिंदे, पेशवाईतील मुत्सद्दी.
- १९९८: पद्मा गोळे, कवयित्री.
- २०००: विष्णुअण्णा पाटील, सहकार क्षेत्रातील नामवंत नेते.
- २००१: भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ |