३ फेब्रुवारी दिनविशेष

३ फेब्रुवारी दिनविशेष - [3 February in History] दिनांक ३ फेब्रुवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
३ फेब्रुवारी दिनविशेष | 3 February in History

दिनांक ३ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


उमाजी नाईक - (७ सप्टेंबर १७९१ - ३ फेब्रुवारी १८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते.


जागतिक दिवस
 • -
ठळक घटना / घडामोडी
 • १६९०: मासेच्युसेट्सने अमेरिकेतील पहिले कागदी चलन वापरायला सुरूवात केली.
 • १८७०: अमेरिकेच्या संविधानातील १५वा बदल अमलात. मतदानातील वंशभेद संपुष्टात.
 • १९१३: अमेरिकेच्या संविधानातील १६वा बदल अमलात. केंद्रीय सरकारला आयकर घेण्यास मुभा.
 • १९६६: सोवियेत संघाचे लुना ९ हे मानवविरहीत अंतराळयान चंद्रावर उतरले.
 • १९८४: स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.
जन्म / वाढदिवस
 • १८११: होरेस ग्रीली, अमेरिकन पत्रकार, संपादक व प्रकाशक.
 • १९२०: हेन्री हाइमलिख, अमेरिकन डॉक्टर.
 • १९६३: रघुराम राजन, भारतीय अर्थशास्त्री.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १४६८: योहान्स गटेनबर्ग, जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक.
 • १८३२: उमाजी नाईक, महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक.
 • १९२४: वूड्रो विल्सन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
 • १९८५: फ्रँक ऑपनहाइमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.