२० फेब्रुवारी दिनविशेष

२० फेब्रुवारी दिनविशेष - [20 February in History] दिनांक २० फेब्रुवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२० फेब्रुवारी दिनविशेष | 20 February in History

दिनांक २० फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


गीत सेठी - (१७ एप्रिल १९६१ ) भारतातील १९८० च्या दशकात संपूर्ण इंग्लिश बिलियर्ड्सचे क्रिकेटपटू म्हणून वर्चस्व गाजवले गेले आणि एक सुप्रसिद्ध हौशी (माजी प्रो) स्नूकर खेळाडू आहेत. ते व्यावसायिक पातळीवरील सहा वेळेचे विजेता आणि हौशी वर्ल्ड चॅम्पियनशिपचा तीन वेळा विजेता आणि इंग्लिश बिलियर्ड्समध्ये दोन जागतिक विक्रमधारक आहेत. त्यांनी प्रकाश पदुकोण सोबत ऑलिंपिक गोल्ड क्वेस्टची स्थापना केली जी भारतातील क्रीडा प्रवर्गासाठी एक फाऊंडेशन आहे.


जागतिक दिवस
 • अरुणाचल प्रदेश दिवस.
 • मिजोरम दिवस.
 • विश्व सामाजिक न्याय दिवस.
ठळक घटना / घडामोडी
 • १७९२: जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केली. अमेरिकन टपाल खाते अस्तित्त्वात.
 • १८३५: कलकत्ता मेडिकल कॉलेज अधिकृतरीत्या खुले झाले
 • १८४६: इंग्रजांनी लाहोरवर कब्जा केला.
 • १८४७: रॉयल कलकत्ता टर्फ क्लबची स्थापना.
 • १९६२: जॉन ग्लेनने फ्रेंडशिप ७ या उपग्रहातून पृथ्वीप्रदक्षिणा केली व हे करणारा प्रथम अमेरिकन ठरला.
 • १९६८: मुंबईमध्ये के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये डॉ. पी. के. सेन यांनीं ह्रदय प्रत्यारोपणाचे पहिले ऑप्रेशन केले.
 • १९७६: मुंबई हायमध्ये कच्च्या तेलाचा व्यावसायिक स्तरावर उत्पादनास सुरवात.
 • १९८२: कन्हार नदीच्या पाण्यावर उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये समझोता झाला.
 • १९८७: मिजोरम आणि अरुणाचल प्रदेश क्रमश: २३वे व २४वे राज्य घोषित.
 • १९८८: गीत सेठीने राष्ट्रीय बिलियर्ड स्पर्धा जिंकली.
 • १९९९: भारताचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानला ऐतिहासिक बस यात्रा केली.
 • १९९९: दूरदर्शनवर खेल चैनल सुरु झाला.
 • २०१४: बऱ्याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने तेलंगण हे भारताचे २९वे राज्य बनले.
जन्म / वाढदिवस
 • १८२७: महात्मा फुले, समाज सेवक.
 • १९०९: अजोय घोष, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एक क्रांतिकारक.
 • १९३२: के. वी. सुबन्ना, प्रसिद्ध कन्नड नाटककार.
 • १९३६: जरनैल सिंह, फुटबॉल खेळाडू.
 • १९४५: अनु कपूर, भारतीय अभिनेता.
 • १९४७: जयंत कुमार मलैया, भारतीय जनता पार्टी नेता, मध्य प्रदेश.
 • १९७६: रोहन गावस्कर, क्रिकेटर.
 • १९८८: जिया खान, भारतीय अभिनेत्री.
 • १९९२: रमेश औटी, चित्रपट संपादक
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १९०५: विष्णुपंत छत्रे, भारतातील सर्कस उद्योगाचे जनक
 • १९५०: शरद चंद्र बोस, स्वतंत्रता सेनानी.
 • १९७२: शिवनारायण श्रीवास्तव, हिंदी साहित्य रचनाकार.
 • १९८५: भवानी प्रसाद मिश्र, हिंदीचे प्रसिद्ध कवी तथा गांधीवादी विचारक.
 • २००५: हंटर एस. थॉम्पसन, अमेरिकन पत्रकार, लेखक.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.