Loading ...
/* Dont copy */

प्रेमाचा चकवा - मराठी कविता

प्रेमाचा चकवा, मराठी कविता - [Premacha Chakwa, Marathi Kavita] वय होतं ते अल्लड, आणि मन होतं कोवळं, चंचल स्वभाव तिचा, पण हृदय होतं सोवळं.

वय होतं ते अल्लड, आणि मन होतं कोवळं, चंचल स्वभाव तिचा, पण हृदय होतं सोवळं

वय होतं ते अल्लड
आणि मन होतं कोवळं
चंचल स्वभाव तिचा
पण हृदय होतं सोवळं

अगदी उगाच सहज
ती बघून हसली होती
त्याच्या खोट्या शपथेला
पूरती फसली होती

निरागस तिला
निर्मळ प्रेमाची तहान होती
त्याची प्रेमाची भाषा
अगदीच वेगळी होती

त्याचा तो स्पर्श
हीन हिंस्त्र वाटला तिला
तिच्यातल्या स्त्रीनं
तत्पर तो ओळखला

नाजूक एकांतात तिनं
स्वतःला सावरलं होतं
अवघड क्षणाला
संयमानं जिंकलं होतं

संबंध त्याच्याशी
कायमचे तिने तोडले
वाईट स्वप्न समजून
पानच ते फाडले

स्पर्शाच्या जाणीवा
धुतल्या तिने आसवानं
चुरगळलेल्या मनाला
सावरलं अलगद धीरानं

बोहल्यावर चढण्यापूर्वी
सावध ती झाली
सीतेची अग्नीपरिक्षा तिला
द्यावी नाही लागली

सुंदर नवीन जीवनात
अगदी आनंदाने रमली
अन्‌ प्रेमाच्या चकव्याला
पून्हा कधी नाही भुलली

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची