रितावल्या पावलांना, गाळल्या भावनांना, सुकलेल्या पाकळ्यांना, भिरभिरल्या काजवांना
रितावल्या पावलांनाभेगाळल्या भावनांना
सुकलेल्या पाकळ्यांना
भिरभिरल्या काजवांना
सल सलते फक्त एकांताची
सांग आहेस कुठे तू एकदाची
पोकळी पोकळ खिन्न मनाची
तडफड उगाच सुन्न तनाची
रांग रांगते बघ चिंब आसवांची
वेळ थांबते मग जणू या क्षणांची
लढाई एकतर्फी रोज रोज श्वासांची
सांग आहेस कुठे तू एकदाची
स्वप्नांची रोजची तीच ती जळमटे
उठतात भावनांची रोज वावटळे
सावलीला सारखा हा भास तू वाटे
ओंजळीत कसे साठवू तुला ना कळे
ओढ आहे फक्त आता त्या नजरेची
सांग आहेस कुठे तू एकदाची
शिंपल्यातील 'तो' मोती मलाही मिळावा
मनाचा गाभारा मग श्रीमंत व्हावा
धुंदाळली खोली या अथांग सागराची
उणीव आहे फक्त आता या नदीची
सांग आहेस कुठे तू एकदाची...
सांग आहेस कुठे तू एकदाची