Loading ...
/* Dont copy */

सात दिवस आणि सहा रात्री - भाग ३ (भयकथा)

सात दिवस आणि सहा रात्री - भाग ३ - मराठी कथा - [Saat Diwas Aani Saha Ratri Part - 3 - Marathi Katha] मित्रांच्या सहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणाऱ्या भयकथेचा भाग ३.

सात दिवस आणि सहा रात्री - भाग ३ - मराठी कथा | Saat Diwas Aani Saha Ratri Part - 3 - Marathi Katha

सहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा


सात दिवस आणि सहा रात्री - भाग ३ (भयकथा)

पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भयानक घटना अनुभवन्यास मिळतात व इथेच मैत्री, प्रेम आणि आयुष्याची खरी किंमत त्यांना कळते या मित्रांच्या सहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा.


ती बेसावध असलेने तिला हा धक्का खूप जोराचा बसतो व तिच्या हाताला थोडी दुखापत होते. नेहाला या गोष्टीचा राग येतो. अजिंक्य नेहाला सावरायला जात असतो. पण प्रार्थनाने त्याचा हात धरून ठेवलेला असतो. व ती नेहाकडे रोखून पाहत असते. तेवढ्यात तिथे विवेक व किरण हे दोघे येतात. विवेक नेहाला सावरतो तो नेहाला विचारतो, ‘नेहा काय झालं?’ त्यावर ती घडलेला प्रकार सांगते. पण अजिंक्य व विवेकच्या समजुतदाराने तो वाद तिथेच मिटतो.

ते सर्वजण दुपारच्या जेवणाला डायनिंग हॉलमध्ये जमतात सर्वजण आपली आवडती डिश ऑर्डर करतात. प्रार्थना मात्र आपल्यासाठी मांसाहारी जेवणाची डिश ऑर्डर करते. तिची ऑर्डर ऐकूण सर्वजण चकीत होतात. सर्वांना प्रश्न पडतो कि ही शुध्द शाकाहारी असलेली ही मुलगी आज मांसाहारी जेवण मागवते म्हणजे काय? सर्वजण याच गोष्टीचा विचार करत असतात तोवर टेबलावर जेवणाच्या डिश येतात. प्रार्थनाच्या नाकात मांसाहरी जेवणाचा वास जातो. ती मान वर करून डोळे उघडते सर्वजण तिलाच पाहत असतात ती त्या मांसाहरी जेवणावर अशी तुटून पडते कि एक हिंस्त्र जनावर आपल्या भक्षावर. एरवी तिचे सुंदर दिसणारे डोळे आज लाल भडक दिसत असतात. ती ज्या पद्धतीने जेवत असते ते पाहून बाकीच्या मित्रांना अगदीच किळस येते.

ते सर्व तिच्यापासून लांब होऊन उभे राहतात. अचानक जेवत असताना तिला एक भयंकर मोठी उचकी येते व ती त्या डायनिंग टेबलवर एकदम कोसळते. ते पाहून अजिंक्य तिच्या जवळ जातो. तिला एक - दोनदा हाक मारतो. पण ती काहीच बोलत नाही हे पाहून तिला उचलून आपल्या बेडरूममध्ये घेऊन जातो. तिला पलंगावर झोपवून बेडरूमचे दार बाहेरून लॉक करतो व विवेक आणि नेहा यांच्या रूममध्ये येतो. ती सर्वजण चिंतेत असतात. किरण अजिंक्यला विचारतो, “अज्या, अचानक काय झालं प्रार्थनाला? ती अशी का बिहेविअर करू लागली आहे?” यावर अजिंक्य म्हणतो, “अरे यार, मला काहिच माहित नाही ती अशी का वागत आहे ते. तिच्या हाताला कसलीतरी जखम झाली आहे.” नेहा म्हणते, “तिला मांसाहरी डिश आवडत नाही त्यावरून असे वाटले कि ही आपली प्रार्थना होती कि आणखी कोण?” नेहाच्या या बोलण्याने अजिंक्य दुःखी होतो त्याला काही क्षणांसाठी रडू कोसळते पण विवेक व नेहा त्याला सांभाळतात.

त्यासर्व घटनांना वैतागून किरण म्हणतो, “शीट‌ यार, आपण इथे कशासाठी आलेलो होतो व काय होत आहे. यू नो गाईज, सेलिब्रेट करण्यासाठीच तर आपण इथे आलेलो होतो.” तेवढयात काळोख पसरतो. अजिंक्य आपल्या रूमकडे जात असतो. त्याला सतत प्रार्थनाची काळजी सतावत असते. रूमचे दार उघडुन आत जातो व रूमच्या आतील दृष्य पाहून एकदम चकीत होतो. रूमच्या प्रत्येक भिंतीवर बदामच्या आकाराचे फुगे लावलेले असतात. पलंग एखाद्या सुहागरात्रीसारखा सजवलेला असतो. सर्वत्र लाल -पिवळ्या रंगाचे दिवे फुलांच्या माळा व वातावरणात एक प्रकारचा मंद सुगंध दरवळत असतो. तो दोन पावले पुढे येतो व अचानक रूमचे दार झाकले जाते. पलंगाच्या टेबलावर एक पत्र ठेवलेले असते. त्या पत्रावर एक प्रेमाची शायरी लिहिलेली असते. त्या शायरीत अजिंक्य व प्रार्थनाच्या लव्ह रिलेशनबाबत लिहिलेले असते. अजिंक्य ते पत्र वाचणार इतक्यात प्रार्थना तिथे येते.

प्रार्थनाने आज संपूर्ण अंगावर लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेला असतो. तिची केशभूषा अत्यंत सुंदर असते. तिच्या हातात एक केक असतो. ती पूर्वीपेक्षा फार सुंदर व रोमॅंटिक दिसत असते. तिच्या डोळ्यात एक प्रकारची वासना दिसत असते. ती अजिंक्यजवळ येते. तो तिला काही विचारणार इतक्यात ती त्याच्या ओठांवर आपले बोट ठेवते व त्याच्या कानात म्हणते, “शूऽऽऽ आज काहीच बोलू नकोस. आजच्या रात्री आपल्याला लव्ह रिलेशनशीप मध्ये येऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत व सेलिब्रेट करायला आपण या सायलेंट व्हॅली परिसरात आलेलो आहोत.” असे म्हणून ती त्याच्या समोर केक धरते व त्याला कट करायला सांगते.

अजिंक्य केक कट करतो प्रार्थना तो कट झालेला पीस आपल्या तोंडात धरते व तशीच अजिंक्यला घेवून पलंगावर पडते. तिथे त्यांचा धूंद प्रणय सुरू होतो. प्रार्थनाच्या शरीरात शिरलेली ती अतृप्त शक्ती एक स्त्री आत्मा असते व ती आपली अतृप्त कामेच्छा अजिंक्यकडून पूर्ण करवून घेते. रात्रभर त्यांचा धुंद प्रणय सुरू असतो. ती अतृप्त स्त्री आत्मा प्रार्थनाच्या शरीराचा वापर करून अजिंक्यकडून आपल्या सर्व प्रकारच्या कामेच्छा पूर्ण करवून घेते.

दिवस उजाडतो. अजिंक्य पलंगावर पडून असतो. त्याची अवस्था फार बिकट झालेली असते. तो शरीराने पूर्ण थकलेला असतो. प्रार्थनाची न संपणारी, न शांत होणारी कामेच्छा अनुभवून तो अचंबित झालेला असतो. विवेक, किरण व नेहा त्या रूममध्ये येतात अजिंक्यला असे निपचीत पडलेला पाहून किरण व विवेक त्याच्या जवळ जाऊन त्याला जागे करतात. नेहा अजिंक्यला प्रार्थनाबद्दल विचारते. तो काहीही न बोलता फक्त बाथरूमकडे बोट दाखवतो. बाथरूमचे दार उघडून प्रार्थना बाहेर येते.

ती नेहमीपेक्षा फार आनंदित व उत्तेजित झालेली असते. ती तिथे आलेल्या सर्वांशी बोलायला लागते. काल आपण आपल्या मित्रांशी कसे वागलो आहोत याचा तिला जरा देखील थांगपत्ता नसतो. ती सर्वांना अगदीच कॅज्यूअली पद्धतीने म्हणते, “चला, आपण ब्रेकफास्ट करू व उरलेले स्पॉट्स पाहू.” पण ते सर्वजण संदिग्ध अवस्थेमध्ये असतात. प्रार्थना त्यांना पुन्हा एकदा ‘चला’ असे म्हणते. नेहा तिला ‘तू हो पुढे, आम्ही येतो’ असे म्हणून कटवते. प्रार्थना तिथून गेल्यावर विवेक अजिंक्यला धीर देत त्याच्या अवस्थेबाबत त्याला विचारतो.

अजिंक्य त्या सर्वांना रात्रीचा घडलेला प्रकार सांगतो. ते ऐकूण तिघेही हबकतात. नेहा अजिंक्यला म्हणते, “अजिंक्य, इफ यू डोण्ट माईंड. आम्ही काल रात्रभर या गोष्टींचा विचार करत होतो व तू सांगितलेली घटना आणि प्रार्थनाचे बिहेविअर पाहता या सर्व घटना नॉर्मल माणसाच्या हातून घडणार्‍या नाहीत.” विवेक तिला विचारतो, “म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुला? प्रार्थना अ‍ॅबनॉर्मल आहे?” यावर नेहा म्हणते, “नाही. मला तसे म्हणायचे नाही. म्हणजे पाहा ना या आधी अशी वागली आहे का प्रार्थना आपल्याशी.”

“आपण येथील काही ठिकाणे पाहायला गेलो व तिथून आल्यापासून प्रार्थना अशी वागू लागली आहे. हे गाईज्‌, रागवू नका थोड‍ं स्पष्ट बोलते. प्रार्थनाच्या बाबतीत काही भूतप्रेतांचा त्रास तर नाही ना घडत.” विवेक नेहाला यावर रागवून म्हणतो, “शट आप नेहा, व्हॉट आर यू सेयिंग, ही वेळ आहे का हे सर्व बोलायची.” किरण विवेकला म्हणतो, “नाही विवेक मला नेहा बोलते ते खरे वाटत आहे.” विवेक यावर वैतागून म्हणतो, “वा! काय मित्र भेटले आहेत आपल्याला.” अजिंक्य नेहाला सौम्य आवाजात म्हणतो, नेहा माझा या गोष्टींवर विश्वास नाही.

मग ते सर्वजण ब्रेकफास्ट करायला जातात. प्रार्थना त्यांना म्हणते, “अरे, केव्हाची मी इथे तुमची वाट पाहत आहे.” ते सर्वजण तिला अगदी सावधपणे पाहत असतात. त्यांची ही अवस्था पाहून प्रार्थना त्यांना म्हणते, “अरे, काय पाहता मला तुम्ही असे.” यावर ते चारही जण भानावर येतात व ब्रेकफास्ट करून उरलेले पिकनिक पॉईंट्स पाहायला बाहेर पडतात. ते लॉजपासून थोड्या अंतरावर बाहेर येतात त्याचवेळी प्रार्थनाच्या शरीरातील अतृप्त स्त्री आत्मा पुन्हा जागृत होते. तिची कामेच्छा पुन्हा एकदा बाहेर येते आणि ती प्रार्थनाकरवी पूर्ण करवून घेण्यासाठी तिच्याकडून एक नाटक करवून घेते. अचानक प्रार्थनाचा पाय मुरगळतो व ती खाली बसते ती अजिंक्यला म्हणते, “आऊच! अजिंक्य माझा पाय खूप दुखत आहे रे. मी आणखी नाही चालू शकत. प्लीज मला रूमवर घेवून चल.” तिचा पाय खराखुरा मुरगळलेला असतो.

क्रमशः



सात दिवस आणि सहा रात्री - मराठी कथा (कथेचे सर्व भाग):


- इंद्रजित नाझरे

अभिप्राय

अभिप्राय: 2
  1. खुप छान लिखाण आहे.... वाचताना अकरशः चित्रं डोळ्यासमोर येतात.....
    भाग ४ वाचण्याची खुप उत्सुकता आहे.....

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. ‘सात दिवस आणि सहा रात्री’ या भयकथेचे ‘भाग ४’ आणि अखेरचा ‘भाग ५’ अनुक्रमे उद्या आणि परवा प्रकाशित होत आहेत.

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

      हटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

नाव

अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनुभव कथन,17,अनुरथ गोरे,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,3,अभिव्यक्ती,1237,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,33,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद थगनारे,3,अरुण कोलटकर,1,अर्चना डुबल,1,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,991,आईच्या कविता,27,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,12,आदित्य कदम,1,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,24,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,17,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,48,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,13,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,68,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,153,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,2,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,3,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगुळकर,5,ग दि माडगूळकर,1,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,1,गणेश तरतरे,17,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,4,गावाकडच्या कविता,13,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,12,गोड पदार्थ,56,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,1,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,428,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,57,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,74,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,62,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,निमित्त,4,निराकाराच्या कविता,9,निवडक,5,निसर्ग कविता,26,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,32,पी के देवी,1,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,3,पुडिंग,10,पुणे,12,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,16,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,95,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,7,बातम्या,9,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,4,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,8,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,17,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मधुसूदन कालेलकर,2,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,103,मराठी कविता,923,मराठी कवी,3,मराठी गझल,26,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,40,मराठी चित्रपट,16,मराठी टिव्ही,49,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,42,मराठी मालिका,18,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,44,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,161,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीमाती,158,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,308,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश बिऱ्हाडे,6,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,3,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,18,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,10,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,6,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,22,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,8,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,रामकृष्ण जोशी,1,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वसंत बापट,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,वि म कुलकर्णी,5,विंदा करंदीकर,2,विक्रम खराडे,1,विचारधन,211,विजय पाटील,1,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,57,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,7,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,50,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,11,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,7,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष महाशब्दे,9,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,31,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,8,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,114,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,20,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,317,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,40,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: सात दिवस आणि सहा रात्री - भाग ३ (भयकथा)
सात दिवस आणि सहा रात्री - भाग ३ (भयकथा)
सात दिवस आणि सहा रात्री - भाग ३ - मराठी कथा - [Saat Diwas Aani Saha Ratri Part - 3 - Marathi Katha] मित्रांच्या सहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणाऱ्या भयकथेचा भाग ३.
https://2.bp.blogspot.com/-SLayvHFg3A0/W3wQa20RFyI/AAAAAAAABUI/hSZP3YoESjgP_gQRXWBtzCPtJIFVTiOcgCLcBGAs/s1600-rw/saat-diwas-aani-saha-ratri-part-3-marathi-katha.webp
https://2.bp.blogspot.com/-SLayvHFg3A0/W3wQa20RFyI/AAAAAAAABUI/hSZP3YoESjgP_gQRXWBtzCPtJIFVTiOcgCLcBGAs/s72-c-rw/saat-diwas-aani-saha-ratri-part-3-marathi-katha.webp
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2018/08/saat-diwas-aani-saha-ratri-part-3-marathi-katha.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2018/08/saat-diwas-aani-saha-ratri-part-3-marathi-katha.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची