एकीकडे एक बहीण पाहातेय रक्षाबंधनाचं स्वप्न तर दुसरीकडे स्वप्नातही न पाहिलेलं रक्षाबंधन
बहीण - भावाचं नातं आणखी दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या खास सणाचं सेलिब्रेशन स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’ आणि ‘छोटी मालकीण’ या मालिकांच्या महाएपिसोडमध्ये होणार आहे. या खास भागात एक बहीण पाहातेय रक्षाबंधनाचं स्वप्न तर दुसरीकडे असेल स्वप्नातही न पाहिलेलं रक्षाबंधन.![]() |
रक्षाबंधन विशेष |
![]() |
रक्षाबंधन विशेष |
![]() |
छोटी मालकीण - रक्षाबंधन विशेष |
‘नकळत सारे घडले’च्या रांगडे पाटील कुटुंबात रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. प्रतापराव आणि प्रिन्सला त्यांची बहिण स्वाती राखी तर बांधतेय, पण त्याच क्षणी तिच्यासमोर आणखी एक हात पुढे होतो आणि तो असतो नेहाचा. आपापसातले सारे मतभेद विसरुन नव्याने सुरुवात व्हावी याच हेतूने नेहाने स्वातीकडून राखी बांधून घेण्याचं ठरवलंय. नेहाची ही इच्छा स्वाती पूर्ण करणार का? भावांसोबतच वहिनीलाही स्वाती स्वीकारणार का? हे ‘नकळत सारे घडले’च्या रक्षाबंधन विशेष भागात पाहायला मिळेल. रविवार २६ ऑगस्टला दुपारी १.०० वाजता आणि सायंकाळी ७.०० वाजता प्रेक्षकांसाठी या विशेष भागाची मेजवानी असेल.
![]() |
रक्षाबंधन विशेष |
तर ‘छोटी मालकीण’मध्ये विराट आणि रेवतीच्या नात्यातील कटुता दूर होणार का? याचा उलगडा होईल. ओवाळणीची तयारी करुन आपल्या भाऊरायाची वाट पाहणाऱ्या रेवतीच्या भेटीला तिचा भाऊ म्हणजेच विराट येणार का? राखीचा हाच धागा रेवती आणि विराटचं नातं पुन्हा बांधेल का? या साऱ्या प्रश्नांची उत्तर महाएपिसोडमध्ये मिळणार आहेत. रविवार २६ ऑगस्टला दुपारी २.०० वाजता आणि रात्री ८.०० वाजता ‘छोटी मालकीण’चा रक्षाबंधन विशेष भाग पाहायला मिळेल.
![]() |
रक्षाबंधन विशेष |
![]() |
रक्षाबंधन विशेष |
भावा - बहिणीच्या अतूट नात्याची साक्ष देणारे हे खास एपिसोड्स तुमचा सणाचा आनंद द्विगुणीत करणारे असणार आहेत. तेव्हा २६ ऑगस्टला नक्की पाहा रक्षाबंधन विशेष भाग. ‘नकळत सारे घडले’ दुपारी १.०० वाजता आणि सायंकाळी ७.०० वाजता तर छोटी मालकीणचा विशेष भाग दुपारी २.०० आणि रात्री ८.०० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.