दिनांक १३ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - (TEXT - TEXT) TEXT.
शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०२१
जागतिक दिवस
१३ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
१३ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १६४२: क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.
- १७९२: फ्रांसच्या राजघराण्यातील व्यक्तींना क्रांतीकारकांनी पकडून तुरुंगात टाकले.
- १८९८: कार्ल गुस्ताव्ह विट याने 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.
- १९१८: बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.
- १९४२: न्यू यॉर्कमध्ये बॅंबी या चित्रपटाचे प्रथम प्रदर्शन.
- १९४३: रिझर्व्ह बॅंकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी.डी. देशमुखांची नियुक्ती.
- १९५४: रेडिओ पाकिस्तान वरुन कौमी तराना हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले.
- १९६१: पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीमधील सीमा बंद केल्या गेल्या. बर्लिन भिंतीचे बांधकाम सुरु.
- १९९१: कन्नड साहित्यिक विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
- २००२: के.के. बिर्ला या उद्योगपतीस कांचीपूरम येथे विद्यासेवारत्न सन्मान प्रदान केला गेला.
- २००४: नागपूरमध्ये संतापलेल्या स्त्रियांनी अक्कू यादव या गुंडाला न्यायालयाच्या आवारात घेरुन ठार मारले.
- २००४: ग्रीसच्या राजधानी अथेन्समध्ये शतकातील पहिल्या ऑलिंपिक स्पर्धांचे उद्घाटन
जन्म / वाढदिवस / जयंती
१३ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८७२: रिर्चड क्लिस्टॅटर (क्लोरोफिलच्या कार्याचे स्पष्टीकरण करून १९१५ चे नोबेल पारितोषिक मिळविणारे जीवशास्त्रज्ञ, मृत्यु: ३ ऑगस्ट १९४२).
- १८८८: जॉन लोगे बेअर्ड (स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक, मृत्यू: १४ जून १९४६).
- १८९०: त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी (मराठी कवी, मृत्यू: ५ मे १९१).
- १८९८: प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे (लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते, मृत्यू: १३ जून १९६९).
- १८९९: सर अल्फ्रेड हिचकॉक (चित्रपट दिग्दर्शक, मृत्यू: २९ एप्रिल १९८०).
- १९०६: विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर (लेखक व दिग्दर्शक, मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९८).
- १९२६: फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ (क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१६).
- १९३६: वैजयंतीमाला बाली ऊर्फ वैजयंतीमाला (भारतीय चित्रपट अभिनेत्री).
- १९४५: रॉबिन जॅकमन (भारतीय - इंग्लिश क्रिकेटर).
- १९८३: संदीपन चंदा (भारताचे ९ वे ग्रँडमास्टर).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१३ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १७९५: अहिल्याबाई होळकर (देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार करणाऱ्या मालवा राजघराण्याच्या महाराणी, जन्म: ३१ मे १७२५).
- १८२६: रेने लायेनेस्क (स्टेथोस्कोप चे शोधक, जन्म: १७ फेब्रुवारी १७८१).
- १९१०: फ्लॉरेन्स नायटिंगेल (आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्या ब्रिटिश परिचारिका, जन्म: १२ मे १८२०).
- १९१७: एडवर्ड बकनर (आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ, जन्म: २० मे १८६०).
- १९४६: एच. जी. वेल्स (विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक, जन्म: २१ सप्टेंबर १८६६).
- १९७१: डब्ल्यू. ओ. बेंटले (बेंटले मोटर्स लिमिटेड चे संस्थापक, जन्म: १६ सप्टेंबर १८८८).
- १९८०: पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे (अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक, जन्म: १२ एप्रिल १९१०).
- १९८५: जे. विलार्ड मेरिऑट (मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक, जन्म: १७ सप्टेंबर १९००).
- १९८८: गजानन जागीरदार (चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक, जन्म: २ एप्रिल १९०७).
- २०००: नाझिया हसन (पाकिस्तानी पॉप गायिका, जन्म: ३ एप्रिल १९६५).
- २०१५: ओम प्रकाश मंजाल (हिरो सायकल चे सहसंस्थापक, जन्म: २६ ऑगस्ट १९२८).
- २०१६: स्वामी महाराज (भारतीय हिंदू नेते प्रमुख, जन्म: ७ डिसेंबर १९२१).
दिनविशेष ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |