९ ऑगस्ट दिनविशेष

९ ऑगस्ट दिनविशेष - [9 March in History] दिनांक ९ ऑगस्ट च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
९ ऑगस्ट दिनविशेष | 9 August in History

दिनांक ९ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - (TEXT - TEXT) TEXT.


शेवटचा बदल ८ ऑगस्ट २०२१

जागतिक दिवस
९ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • ग्रंथालय दिवस: भारत.
 • ऑगस्ट क्रांती दिवस: भारत.
 • भारत छोडो दिवस: भारत.
 • राष्ट्र दिवस: सिंगापुर.
 • राष्ट्रीय महिला दिवस: दक्षिण आफ्रिका.

ठळक घटना / घडामोडी
९ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १०४८: २३ दिवस पोपपदी राहिल्यावर पोप दमासस दुसर्‍याचा मृत्यू.
 • ११७३: पिसाच्या मिनार्‍याचे बांधकाम सुरू. बांधकाम संपण्यास २०० वर्षे लागलेला हा मिनारा चुकीने कलता बांधला गेला.
 • १८६२: अमेरिकन यादवी युद्ध - सीडर माउंटनची लढाई.
 • १८९२: थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.
 • १९०२: एडवर्ड सातवा इंग्लंडच्या राजेपदी.
 • १९२५: भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लखनौजवळ काकोरी येथे रेल्वेगाडीची लूट.
 • १९४२: चले जाव आंदोलन - मुंबईत महात्मा गांधींना अटक.
 • १९४५: जपानच्या नागासाकी शहरावर अमेरिकेने परमाणु बॉम्ब टाकला. ७० ते ९० हजार व्यक्ती काही क्षणांत ठार, असंख्य जखमी. इतर हजारो व्यक्ती पुढील काही वर्षात आजाराने मृत्युमुखी.
 • १९६५: अमेरिकेतील लिटल रॉक, आर्कान्सा येथील क्षेपणास्त्र तळावर आग. ५३ ठार.
 • १९६५: मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
 • १९७४: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनच्या राजीनाम्यानंतर जेरी फोर्ड राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९७५: पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.
 • १९८७: ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात १९ वर्षीय ज्युलियन नाइटने अंदाधुंद गोळ्या चालवुन ९ व्यक्तींना ठार मारले. इतर १९ जखमी.
 • १९८९: कैफु तोशिकी जपानच्या पंतप्रधानपदी.
 • १९९३: आल्बर्ट दुसरा बेल्जियमच्या राजेपदी.
 • १९९३: छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगता समारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन.
 • २०००: अमेरिकेच्या बर्लिंग्टन, न्यू जर्सी शहराजवळ पायपर नवाहो व पायपर सेमिनोल प्रकारच्या विमानांची हवेत टक्कर. ११ ठार.
 • २०००: भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर.
 • २००१: इस्रायेलची राजधानी जेरुसलेममध्ये दहशतवाद्यांच्या बॉम्बहल्ल्यात १५ ठार व १३० जखमी.

जन्म / वाढदिवस / जयंती
९ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १७५४: पिअर चार्ल्स एल्फांट (वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता, मृत्यू: १४ जून १८२५).
 • १७७६: अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो (इटालियन रसायनशास्त्रज्ञ, मृत्यू: ९ जुलै १८५६).
 • १८१९: विष्णूदास अमृत भावे (मराठी रंगभुमीचे जनक, मृत्यु: १९०१).
 • १८९०: केशवराव भोसले (संगीत सौभद्र मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते संगीतसूर्य, मृत्यू: ४ आक्टोबर १९२१).
 • १९०९: डॉ. विनायक कृष्ण गोकाक (ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक, मृत्यू: २८ एप्रिल १९९२).
 • १९२०: कृ. ब. निकुंब (भावकवी, जन्म: २२ नोव्हेंबर १९१९).
 • १९७५: महेश बाबू (भारतीय अभिनेते आणि निर्माते).
 • १९९१: हंसिका मोटवानी (भारतीय अभिनेत्री व मॉडेल).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
९ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ११७: ट्राजान (रोमन सम्राट, जन्म: १८ सप्टेंबर ५३).
 • ११०७: होरिकावा (जपानी सम्राट, जन्म: ८ ऑगस्ट १०७८).
 • १९०१: विष्णूदास अमृत भावे (मराठी रंगभुमीचे जनक, जन्म: ९ ऑगस्ट १८१९).
 • १९४८: हुगो बॉस (हुगो बॉस कानी चे संस्थापक, जन्म: ८ जुलै १८८५).
 • १९७६: जान निसार अख्तर (ऊर्दू शायर व गीतकार, जन्म: १४ फेब्रुवारी १९१४).
 • १९९६: फ्रॅंक व्हाटलेट (जेट इंजिन चे शोधक, जन्म: १ जुन १९०७).
 • २००२: शांताबाई दाणी (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी, जन्म: १ जानेवारी १९१८).
 • २०१५: काययार सिंहनाथ राय (भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी, जन्म: ८ जून १९१५).

दिनविशेष        ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑगस्ट महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.