कुणाच्याही भविष्यावर भाष्य करण्याचा अधिकार आपल्याला नसतो
एक स्त्री स्वतःला फार चतुर समजत असे, तिला भूत, भविष्य, वर्तमान समजते अशी प्रसिद्धी तीने स्वतःच्या बाबतीत पसवली होती.पुढे काही दिवसांनी तिच्यावर चेटुक केल्याचा आरोप येऊन तिला फाशीची शिक्षा झाली.
ठरलेल्या दिवशी तिला फाशी देण्याच्या ठिकाणाकडे घेऊन जात असता, रस्त्यातली एका स्त्रीने तिला विचारले, ‘बाई, लोकांचे बरे वाईट करविण्याविषयी तुला जर देवाचे मन वळविता येत होते, तर आता ज्या न्यायाधीशांनी तुला ही शिक्षा दिली, ते माणूस असता, त्यांचे मन तुला वळविता येऊ नये हे आश्चर्य नव्हे काय?’
तात्पर्य: जी व्यक्ती स्वतःच्या बाबतीत बरेवाईट भाकीत करू शकत नाही त्या व्यक्तिला दुसर्या कुणाच्या भविष्यावर भाष्य करण्याचा अधिकार नसतो.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा