Loading ...

माझ्या आत फडफडणारा अखेरचा झेंडा (आतले-बाहेरचे)

मराठीमाती डॉट कॉमचे निर्माते-मुख्य संपादक, लेखक आणि कवी हर्षद खंदारे यांची माझ्या आत फडफडणारा अखेरचा झेंडा हा संपादकीय लेख.

माझ्या आत फडफडणारा अखेरचा झेंडा (संपादकीय)

दिखावू देशप्रेमाच्या आड दडलेल्या अंतर्गत पोकळीवर उपरोधिक भाष्य करणारा ‘माझ्या आत फडफडणारा अखेरचा झेंडा’...

माझ्या आत फडफडणारा अखेरचा झेंडा

हर्षद खंदारे (मराठीमाती डॉट कॉमचे निर्माते-मुख्य संपादक)

या लेखात काय वाचाल

• लेखात एका राजकीय दिनक्रमाचे चित्रण आहे—तयारी, दौरे, सत्कार आणि भाषणे. • झेंडा हा प्रतीक म्हणून सुरुवातीला अभिमानाचा भाग वाटतो. • परंतु दिवस संपता संपता त्या प्रतीकाची किंमत उघडी पडते. • अखेरीस उरतो तो अंतर्मनात फडफडणारा, हरवलेल्या मूल्यांचा अखेरचा झेंडा.

आजचा दिवस जरा खास होता; एक तास लवकर सुरू झाल्याने. झोप पूर्ण न झाल्याची ब्रेकिंग न्यूज दिवसभर कवटीच्या आत-बाहेर रेंगाळणार होती. दोन दिवसांपूर्वीच नेहरू शर्ट आणि पायजमा करकरीत इस्त्री करून घेतला असल्याने तो प्रश्न सुटला होता. राजाभाऊंनी कालच दोन डझन प्लॅस्टिकचे झेंडे आणून ठेवले होते (हल्ली कागदी झेंड्यांची फॅशन नसल्याने आणि कापडी झेंडे परवडत नसल्याने...). ‘राजाभाऊऽऽऽ’ मी ओरडलो. ‘काय मालक?’ राजाभाऊंचं उत्तर. ‘अरे त्या कोल्हापुरीला पॉलिश करायचंय; पॉलिशशिवाय बरं दिसेल काय?’ ‘मालक, मी रात्रीच करून ठेवलीय की,’ राजाभाऊंनी आत्मविश्वासानं दिलेलं उत्तर मला आवडलं. फटाफट आंघोळ झाली, नंतर कपडे वगैरे... चकाकणारी कोल्हापुरी चप्पल घालून मी आरशात स्वतःला नमस्कार करून घेतला आणि राजाभाऊंनी केलेल्या खास आमलेटाचा बेत संपवून घराबाहेर पडलो. कार्यकर्त्यांची थोडीफार गर्दी होती; सगळे बिचारे थंडीने पार गारठलेले. त्यातल्या एका अनुभवी कार्यकर्त्याने माझ्या डोक्यावर टोपी नसल्याचे खुणवले. मला तो इशारा कळण्याच्या आतच आप्पांनी माझ्या हातात एक करकरीत आणि कडक गांधी टोपी दिली. मी आता ती टोपी घालून ‘स्कॉर्पिओ ९९९९’ मध्ये बसलो होतो—काय तो रूबाब! रंग्याने गाडीला स्टार्टर मारलेला होता. आमची पहिली भेट तालुक्याच्या शाळेला, दुसरी शासकीय रुग्णालयात, नंतर वाचनालय, वसतीगृह; वसतीगृहानंतर व्यापारी बँकेत. मात्र जवळचे सर्व झेंडे संपले असल्याने सिग्नलवर काही झेंडे विकत घेणे भाग होते (झेंडे विकत घेणे हा प्रकार माझ्यासाठी तसा नवा होता). सिग्नलवर एक शेंबडं पोरगं हातात झेंडे आणि कडेवर एक काळवंडलेलं तान्हं नागडं बाळ घेऊन आमच्या जवळ आलं. ‘पाच का दो, साहब?’ मी म्हटलं, ‘दहा चे सहा देतो का?’ हो-नाही करता करता दहा चे पाच झेंडे घेऊन व्यवहार फायनल झाला. व्यापारी बँकेत मामाजी सत्कारासाठी पुढे आले; नंतर भाषण वगैरे—सर्व कसं नियोजित. भाषणात सर्व थोरांचा उल्लेख करून झाल्यानंतर सांगता केली. त्यानंतर चहा-पाणी... परतीचा प्रवास. रात्री डाक बंगल्यावर आमदार साहेबांसोबत तालुक्याच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विशेष बैठक ठेवलेली होती. त्याचबरोबर तालुक्यातील कलावंतांचा एक छोटेखानी कार्यक्रमही ठेवला होता (अमेरिका, जर्मनी, रोम इ. देश फिरूनही माझे पाय घट्ट मातीशी होते; माझ्या संस्कृतीचा, कलेचा मला अभिमान होताच). तालुक्यातील दुःखितांचे प्रश्न बघून मन खिन्न होत असतेच; त्यामुळे कार्यकर्त्यांनी ‘औषधाची’ सोय आधीच केली होती. आता थकवा घालवण्यासाठी आमचा अभिषेक सुरू झाला होता. गावठी कोंबडी, तिचीच अंडी—माहोल छान रंगला होता. सकाळी करकरीत इस्त्री करून घातलेला नेहरू शर्ट आणि पायजमा धावपळीत पार चुरगळला होता, मळला होता. डोक्यावरची पांढरी गांधी टोपी माझ्याच खुर्चीखाली धूळ खात पडली होती आणि उरलेला एक ‘झेंडा’ हाडकांच्या ढिगाऱ्याखाली—तुमच्या आणि माझ्या डोळ्यांत हरवलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाचे क्षण कुठे दिसतात का?—हे शोधत अखेरचा श्वास घेत होता.

हर्षद खंदारे यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची