अस्वल आणि कोल्हा

अस्वल आणि कोल्हा, इसापनीती कथा - [Aswal Aani Kolha, Isapniti Katha] ज्या वस्तूचा उपयोग करून घेता येणे आपणास शक्य नाही, त्या वस्तूसंबंधाने आपण अगदी निरपेक्ष आहोत, असे भासविण्याचा प्रयत्न करणे हा केवळ ढोंगीपणा होय.
अस्वल आणि कोल्हा - इसापनीती कथा | Aswal Aani Kolha - Isapniti Katha

निरूपयोगी वस्तुंबाबत निरपेक्षता दाखविणे म्हणजे निव्वळ ढोंगीपणा

असे सांगतात की, अस्वल मनुष्याच्या प्रेतास शिवत नाही.

एके दिवशी एक अस्वल म्हणाले, ‘मनुष्यजातीसंबंधाने माझी इतकी आदरबुध्दी आहे की, मला जरी कोणी पृथ्वीचे राज्य देऊ केले, तरी मनुष्याच्या प्रेतास मी कधी धक्का लावणार नाही.’

हे ऐकून कोल्हा त्यास म्हणतो, ‘अरे, तू म्हणतोस ते कदाचित खरे असेल, पण मनुष्याच्या प्रेताची तुला जशी दया येते, तशीच जर मनुष्याची येईल, तर तुझ्या ह्या बढाईत काही तरी अर्थ आहे, असे मी समजेन.’

तात्पर्य: ज्या वस्तूचा उपयोग करून घेता येणे आपणास शक्य नाही, त्या वस्तूसंबंधाने आपण अगदी निरपेक्ष आहोत, असे भासविण्याचा प्रयत्न करणे हा केवळ ढोंगीपणा होय.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.