Loading ...
/* Dont copy */

हॉस्टेल डेज चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर

हॉस्टेल डेज चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर, मराठी टिव्ही - [Hostel Days World Television Premiere, Marathi TV].

हॉस्टेल डेज चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर - टीव्ही - Hostel Days World Television Premiere - TV

१२ ऑगस्टला पाहा हॉस्टेल डेज स्टार प्रवाहवर


हॉस्टेल डेज चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर

प्रार्थना बेहेरे,आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी,अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हॉस्टेल डेज’.


प्रार्थना बेहेरे,आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी,अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हॉस्टेल डेज’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर १२ ऑगस्टला दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाहवर’ पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

हॉस्टेल डेजची आठवण करुन देणारा हा सिनेमा आहे. या सिनेमात १९९० चा काळ दाखवण्यात आलाय. साताऱ्यातील कोपरगाव या काल्पनिक ठिकाणी स्थित एका हॉस्टेलची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळेल. त्याकाळात हॉस्टेल ही संकल्पना नव्याने रुजू लागली होती. हे जग विद्यार्थ्यांसाठी नवं होतं.

शिक्षणासाठी घरापासून दूर राहावं लागत असल्यामुळे कॉलेज हेच त्यांचं दुसरं घर बनलं होतं. शिवाय मोबाईल, इंटरनेट या गोष्टी नसल्यामुळे मित्रपरिवार घट्ट होता. मित्रमंडळींच्या सहवासातल्या काही हस-या आणि काही मनाला चटका लावणा-या आठवणींची गोष्ट म्हणजे ‘हॉस्टेल डेज’ हा सिनेमा.

१९९० चा काळ हा रोमॅण्टिक गाण्यांसाठी देखिल ओळखला जातो. त्यामुळे हॉस्टेल डेज सिनेमातूनही असाच सांगितीक नजराणा मिळणार आहे. या सिनेमात एकूण ८ गाणी आहेत आणि ती आघाडीच्या बॉलिवूड गायकांनी गायली आहेत. सोनू निगम, कुमार सानू, शंकर महादेवन, शान, कुणाल गांजावाला, अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे यांसारखे आघाडीचे गायक त्यासाठी एकत्र आले आहेत. हॉस्टेल डेजचं दिग्दर्शन आणि संगीत अजय नाईक यांनी केलंय.

तेव्हा हॉस्टेल मधली ही जादुई दुनिया अनुभवायची असेल तर ‘हॉस्टेल डेज’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर पाहायला विसरु नका १२ ऑगस्टला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची