जय देवी हरितालिके - हरितालिकेची आरती

जय देवी हरितालिके, हरितालिकेची आरती - [Jai Devi Hartalike Hartalikechi Aarti] जय देवी हरितालिके, सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीपकळिके.
जय देवी हरितालिके - हरितालिकेची आरती | Jai Devi Hartalike - Hartalikechi Aarti

जय देवी हरितालिके, सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीपकळिके

जय देवी हरितालिके ।
सखी पार्वती अंबिके ॥
आरती ओवाळीते ज्ञानदीपकळिके ॥ ध्रु० ॥

हर-अर्धांगी वससी ॥
जाशी यज्ञा माहेरासी ॥
तेथे अपमान पावसी ।
यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय० ॥ १ ॥

रिघसी हिमाद्रीच्या पोटी ।
कन्या होसी तू गोमटी ॥
उग्रतपश्चर्या मोठी ।
आचरसी उठाउठी ॥ जय० ॥ २ ॥

तपपंचाग्निसाधने ।
धूम्रपाने अधोवसने ॥
केली बहु उपोषणे ।
शंभुभ्रताराकारणे ॥ जय० ॥ ३ ॥

लीला दाखविसी दृष्टी ।
हे व्रत करिसी लोकांसाठी ॥
पुन्हा वरिसी धूर्जटी ।
मज रक्षावे संकटी ॥ जय० ॥ ४ ॥

काय वर्णू तव गुण ।
अल्पमति नारायण ॥
माते दाखवी चरण ।
चुकवावे जन्ममरण ॥ जय० ॥ ५ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.