३१ ऑगस्ट दिनविशेष - [31 March in History] दिनांक ३१ ऑगस्ट च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
दिनांक ३१ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - (TEXT - TEXT) TEXT.
शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०२१
जागतिक दिवस
३१ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- स्वभाषा दिन: मोल्दोव्हा.
- स्वातंत्र्य दिन: त्रिनिदाद व टोबेगो, किर्गिझीस्तान.
ठळक घटना / घडामोडी
३१ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १८०३: लुईस आणि क्लार्क पिट्सबर्गहून आपल्या मोहिमेवर निघाले.
- १८६४: अमेरिकन यादवी युद्ध-जनरल विल्यम टी. शेरमानने अटलांटावर हल्ला केला.
- १८७६: ऑट्टोमन सुलतान मुराद पाचव्याला पदच्युत करून त्याचा भाऊ अब्दुल हमीद दुसरा सम्राटपदी.
- १८८६: चार्ल्स्टन, दक्षिण कॅरोलिनामध्ये भूकंप. १०० ठार.
- १८९७: थॉमस अल्वा एडिसनने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला.
- १९२०: डेट्रॉइटमध्ये पहिल्यांदा रेडियोवरुन बातम्या प्रसारित झाल्या.
- १९२०: खिलाफत चळवळीची सुरुवात.
- १९३९: जर्मनीच्या हस्तकांनी जर्मनीतील ग्लाईवित्झ रेडियो स्थानकावर हल्ला केला. हा हल्ला पोलंडने केल्याची सबब सांगून दुसर्या दिवशी जर्मनीने पोलंडवर चाल केली व दुसर्या महायुद्धास सुरुवात झाली.
- १९४७: भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
- १९५७: मलेशियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६२: त्रिनिदाद आणि टोबॅगोला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६८: सर गारफील्ड सोबर्सने एका षटकात ६ षटकार फटकावले.
- १९७०: राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
- १९७१: अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.
- १९८६: सेरिटोस, कॅलिफोर्नियाजवळ एरोमेक्सिको फ्लाइट ४९८ हे विमान पायपर पी.ए.-२८ प्रकारच्या विमानाव आदळले. जमीनीवरील १५सह ७९ ठार.
- १९८६: सोवियेत संघाचे प्रवासी जहाज ॲडमिरल नाखिमोव मालवाहू जहाज प्यॉत्र व्हासेवशी आदळून बुडले. ४२३ ठार.
- १९९१: किर्गिझस्तानला सोवियेत संघापासून स्वातंत्र्य.
- १९९६: पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
- १९९७: पॅरिसमध्ये अपघातात राजकुमारी डायना व तिचा मित्र डोडी फयेद ठार.
- १९९९: बॉयनोस एर्सच्या होर्हे न्यूबरी विमानतळावरुन उड्डाण केल्यावर लगेच बोईंग ७३७-२०० प्रकारचे विमान कोसळले. जमीनीवरील दोघांसह ६५ ठार.
- २००५: बगदादच्या अल-आइम्माह पूलावर झालेल्या चेंगराचेंगरीत १,१९९ ठार.
जन्म / वाढदिवस / जयंती
३१ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १५६९: जहांगीर (४ था मुघल सम्राट, मृत्यू: २८ ऑक्टोबर १६२७).
- १८७०: मारिया माँटेसरी (इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ज्ञ, मृत्यू: ६ मे १९५२).
- १९०२: दामोदर गंगाराम उर्फ दामू धोत्रे (रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस मालक, मृत्यु: १९७२).
- १९०७: रॅमन मॅगसेसे (फिलिपाइन्सचे ७वे राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: १७ मार्च १९५७).
- १९१९: अमृता प्रीतम (लेखिका व कवयित्री, मृत्यू: ३१ ऑक्टोबर २००५).
- १९३१: जयवंत कुलकर्णी (पार्श्वगायक, मृत्यू: १० जुलै २००५).
- १९४०: शिवाजी सावंत (मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक, मृत्यू: १८ सप्टेंबर २००२).
- १९४४: क्लाइव्ह लॉइड (वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू).
- १९६३: ऋतुपर्ण घोष (भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक, मृत्यु: ३० मे २०१३).
- १९६९: जवागल श्रीनाथ (जलदगती गोलंदाज).
- १९७९: युवन शंकर राजा (भारतीय गायक - गीतकार आणि निर्माते).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
३१ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १४२२: हेन्री (पाचवा) (इंग्लंडचा राजा, जन्म: १६ सप्टेंबर १३८६).
- १९७३: ताराबाई मोडक (शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या, जन्म: १९ एप्रिल १८९२).
- १९९५: सरदार बियंत सिंग (खलिस्तानी चळवळ मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री, जन्म: १९ फेब्रुवारी १९२२).
- १९९७: प्रिन्सेस डायना (ब्रिटीश राजकुमारी, जन्म: १ जुलै १९६१).
- २०१२: काशीराम राणा (भाजपाचे लोकसभा सदस्य, जन्म: ७ एप्रिल १९३८).
दिनविशेष ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |