दिनांक ८ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - (TEXT - TEXT) TEXT.
शेवटचा बदल ७ ऑगस्ट २०२१
जागतिक दिवस
८ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- पितृ दिन: तैवान (मॅंडेरिन भाषेत बा बा या शब्दांचा अर्थ वडील असा होतो!)
ठळक घटना / घडामोडी
८ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १५०९: सम्राट कृष्णदेवरायचा राज्याभिषेक व विजयनगर साम्राज्याची स्थापना.
- १६४८: स्वराज्याची पहिली लढाई – पुणे सातारा मार्गावरील खळत-बैलसरच्या लढाईत आदिलशहाचा सरदार फत्तेहखानाच्या फौजेचा शिवाजीराजांनी सपशेल पराभव केला.
- १७८६: जॉक बाल्मात व मिशेल-गॅब्रियेल पकार्डनी युरोपमधील सर्वोच्च शिखर मॉंत ब्लांकवर सर्वप्रथम सफल चढाई केली.
- १८६३: गेटिसबर्गच्या लढाईत हार पत्करल्यावर दक्षिणेच्या सेनापती रॉबर्ट ई. लीने राजीनामा दिला(जो अस्वीकृत झाला).
- १९०८: विलब राइट यांनी पहिले उड्डाण केले.
- १९१८: पहिले महायुद्ध-अमियेन्सची लढाई - दोस्त राष्ट्रांची जर्मनीविरुद्ध आगेकूच.
- १९४२: दुसरे महायुद्ध - अमेरिकेत ६ जर्मन व्यक्तींना हेर असल्याच्या आरोपाखाली मृत्युदंड.
- १९४२: क्रांतिदिन. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले.
- १९४२: ‘चले जाव’चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.
- १९४२: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जाव चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला.
- १९४५: भूतानची स्थापना.
- १९६३: इंग्लंडच्या बकिंगहॅमशायर काउंटीत दरोडेखोरांनी रेल्वेतून २६,००,००० ब्रिटीश पाउंड लुटले.
- १९६७: इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड यांनी ASEAN ची स्थापना केली.
- १९७४: वॉटरगेट कुभांड - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने राजीनामा दिला.
- १९८५: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.
- १९८८: म्यानमारचा राज्यकर्ता ने विनने राजीनामा दिला.
- १९९४: पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.
- १९९८: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.
- २०००: महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर.
- २००८: चीनमधील बिंजिंग येथे येथे २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
जन्म / वाढदिवस / जयंती
८ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १०७८: होरिकावा (जपानी सम्राट, मृत्यू: ९ ऑगस्ट ११०७).
- १८७९: डॉ. बॉब स्मिथ (अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस चे सहसंस्थापक, मृत्यू: १६ नोव्हेंबर १९५०).
- १९०२: पॉल डायरॅक (नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: २० ऑक्टोबर १९८४).
- १९१२: बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण (जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी, (मृत्यू: २० डिसेंबर १९९८)
- १९१२: तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर (कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज, मृत्यू: ३१ मार्च २००४)
- १९२६: शंकर पाटील (साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारती चे संपादक, मृत्यू: ३० जुलै १९९४).
- १९३२: दादा कोंडके (अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक, मृत्यू: १४ मार्च १९९८).
- १९३४: शरत पुजारी (भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक शरत पुजारी यांचा जन्म. (मृत्यू: १२ मे २०१४).
- १९४०: दिलीप सरदेसाई (भारतीय क्रिकेटपटू, मृत्यू: २ जुलै २००७).
- १९५२: सुधाकर राव (भारतीय क्रिकेटपटू ).
- १९६८: ऍबे कुरिविला (भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक).
- १९८१: रॉजर फेडरर (स्विस टेनिस खेळाडू.).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
८ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८२७: जॉर्ज कॅनिंग (ब्रिटनचे पंतप्रधान, जन्म: ११ एप्रिल १७७०).
- १८९७: व्हिक्टर मेयर (जर्मन रसायनशास्त्रज्ञ, जन्म: ८ सप्टेंबर १८४८).
- १९९८: डॉ. सुमती क्षेत्रमाडे (लेखिका व कादंबरीकार, जन्म: ८ ऑगस्ट १९९८).
दिनविशेष ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |