सगळं संपलय - मराठी कविता

सगळं संपलय, मराठी कविता - [Sagala Sampalay, Marathi Kavita] पोलिसांच्या भावना हद्दीत संपल्यात, थोरांचे विचार रद्दीत संपलेत.
सगळं संपलय - मराठी कविता | Sagala Sampalay - Marathi Kavita
पोलिसांच्या भावना हद्दीत संपल्यात
थोरांचे विचार रद्दीत संपलेत

पावसाचं पाणी सिंचनात संपलय
सरकारी योजना चिंतनात संपलीय

राजकारण प्रचारात संपलय
समाजकारण आचारात संपलय

शांतता शोधात संपलीय
अशांतता रोधात संपलीय

ज्ञानदान स्पर्धात संपलय
ज्ञानार्जन अर्ध्यात संपलय

कल्पना आशयात संपलीय
भूमिका विषयात संपलीय

विकास रस्ता खड्ड्यात संपलाय
मिळून मिसळून टक्क्यात संपलाय

आजाराचं निदान ऐपतीत संपलय
त्या देवावरच्या भक्तीची कैफियत संपलीय

न्याय निवाडा तारखेत संपलाय
हस्तक्षेपकांच्या पारखेत संपलाय

नात्यांचं जुळणं जातीत संपलय
विविध रंगी मातीत संपलय

आधी माणूस माणसात जगायचा
आता माणूसकी माणसात संपलीय

1 टिप्पणी

  1. कारण सर्वजण मर्यादा विसरलेत.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.