तुझं - मराठी कविता

तुझं, मराठी कविता - [Tujha, Marathi Kavita] जेव्हा होईन उदास, असे मनी एक आस, एक आवाज तो खास, तुझं गाणं.
तुझं - मराठी कविता | Tujha - Marathi Kavita
जेव्हा होईन उदास
असे मनी एक आस
एक आवाज तो खास
तुझं गाणं

अश्रू ढळतील खूप
न दिसे तुझे रुप
आधार अनुरुप
तुझं हास्य

होता निर्मळ संकोच
मनी भाव तरी तोच
अंग अंग शहारवतोच
तुझा स्पर्श

सुगंध चंदनाचा
प्रकाश मोत्याचा
तलम कापडावरी
तुझी त्वचा

लाड करु ते किती
माझ्या प्रेमाची ना मिती
सारे पाश मिटती
तुझं स्मरण

बोलण्यात गोडवा
ऐकण्यात मारवा
हट्ट एकच हवा
तुझी हाक

किती आवरु मना
लागे तुझ्याही मना
गोड समजशील ना
माझा टोमणा

हृद्यात उतरतेस
आणखीन माझी होतेस
जेव्हा खांद्यावर ठेवतेस
तुझं डोकं

तुझं मला बिलगणं
हळूच वर पहाणं
जणू मोगर्‍याचं फुलणं
कारण माझं चुंबन

आता माझे ते तुझे मन
हात हातात एक क्षण
कधी करशील प्रिये
तुझे चुंबन

उरी होई धडधड
तुझे बोलणेही जड
मला उमजे ग सखे
तुझी तडफड

डोळ्यातील एक आसू
नको पापण्यात बसू
त्या मिटतानाही दिसू
दे फक्त तू

२ टिप्पण्या

  1. Mast
    1. धन्यवाद!
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.