५ ऑगस्ट दिनविशेष

५ ऑगस्ट दिनविशेष - [5 March in History] दिनांक ५ ऑगस्ट च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
५ ऑगस्ट दिनविशेष | 5 August in History

दिनांक ५ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - (TEXT - TEXT) TEXT.


शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०२१

जागतिक दिवस
५ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • स्वातंत्र्य दिन: बर्किना फासो.
 • विजयदिन, मातृभूमी आभार दिन: क्रोएशिया.
 • बाल दिन: चिली.

ठळक घटना / घडामोडी
५ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • ११००: हेन्री पहिला इंग्लंडच्या राजेपदी.
 • १३०५: स्कॉटिश क्रांतीकारी विल्यम वॉलेस ग्लासगो जवळ पकडला गेला.
 • १८६०: कार्ल चौथा स्वीडनच्या राजेपदी.
 • १८६१: अमेरिकन यादवी युद्ध - युद्धाच्या खर्चास हातभार लागावा म्हणून अमेरिकन सरकारने प्रथमतः आयकर लागू केला.
 • १८८२: जपानमध्ये लश्करी कायदा लागू.
 • १९०१: पीटर ओ'कॉनोरने २४ फूट ११.७५ ईंच लांब उडी मारून विश्वविक्रम रचला.
 • १९१४: जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा अमेरिकेच्या क्लीव्हलॅंड शहरात सुरू झाला.
 • १९४४: दुसरे महायुद्ध - ऑस्ट्रेलियाच्या कौरा गावाजवळील युद्धबंद्यांच्या तुरुंगातून ५४५ जपानी युद्धबंदी पळाले. बव्हंशी मारले गेले व उरलेल्यांपैकी मोठ्या संख्येने आत्महत्या केली.
 • १९४४: ज्यूंचे शिरकाण - पोलिश क्रांतीकार्‍यांनी वॉर्सोतील कारागृहातून ३४८ बंद्यांची सुटका केली.
 • १९४९: इक्वेडोरमध्ये भूकंप. ६,००० ठार.
 • १९६०: बर्किना फासोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
 • १८६१: अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.
 • १९६२: कन्या नक्षत्रात पहिल्या क्‍वासार तार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.
 • १९६२: मॅरिलिन मन्रोने आत्महत्या केली.
 • १९६२: दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेलाला कैद. २८ वर्षांनी १९९०मध्ये सुटका.
 • १९६४: व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेच्या यु.एस.एस. टिकोंडेरोगा व यु.एस.एस. कॉन्स्टेलेशन या विमानवाहू युद्धनौकांवरील विमानांनी टोंकिनच्या अखातातील हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून उत्तर व्हियेतनामवर बॉम्बफेक केली. वस्तुतः टोंकिनच्या अखातातील हल्ला ही बनावट घटना होती.
 • १९६५: पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.
 • १९८१: अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनने संपावर असलेल्या ११,३८१ हवाई वाहतूक नियंत्रकांना नोकरीतून काढून टाकले.
 • १९९४: इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान.
 • १९९५: क्रोएशियाच्या सैन्याने सर्बियातील क्निन शहर जिंकले.
 • १९९७: रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन सोयूझ-यू हे अंतराळयान मीर अंतराळस्थानकाकडे रवाना.
 • १९९७: फ्रेंच खुल्या लॉनटेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात विजेतेपद मिळवणार्‍या महेश भूपतीला क्रीडा खात्यातर्फे २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर.
 • २००६: मराठी विकिपिडीयाने ५,००० लेखांचा टप्पा ओलांडला.
 • २०१२: अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ओक क्रीक शहरातील गुरुद्वारामध्ये घुसून एका माथेफिरूने गोळीबार केला. सहा व्यक्ती ठार. हल्लेखोराला पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले.
 • २०१९: जम्मू आणि काश्मीर राज्याचे विभाजन. जम्मू आणि काश्मीर व लद्दाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात.

जन्म / वाढदिवस / जयंती
५ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९४७: टोनी ओपाथा (श्रीलंकेचे क्रिकेटर, मृत्यू: ११ सप्टेंबर २०२०).
 • १८५८: वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे (इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी, मृत्यू: ११ जून १९२४)
 • १८९०: दत्तो वामन पोतदार (इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय, मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७९).
 • १९३०: नील आर्मस्ट्राँग (चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव, मृत्यू: २५ ऑगस्ट २०१२).
 • १९३३: विजया राजाध्यक्ष (लेखिका व समीक्षिका).
 • १९५०: महेंद्र कर्मा (भारतीय वकील आणि राजकारणी, मृत्यू: २५ मे २०१३).
 • १९६९: वेंकटेश प्रसाद (भारतीय क्रिकेट खेळाडू, जलदगती गोलंदाज).
 • १९७२: अकिब जावेद (पाकिस्तानी जलदगती गोलंदाज).
 • १९७४: काजोल (भारतीय अभिनेत्री).
 • १९८७: जेनेलिया डिसोझा (भारतीय अभिनेत्री).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
५ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • ८८२: लुई (तिसरा) (फ्रान्सचा राजा, जन्म: ८६३/८६५).
 • १९६२: मेरिलीन मन्‍रो (अमेरिकन अभिनेत्री, जन्म: १ जून १९२६).
 • १९८४: रिचर्ड बर्टन (अभिनेते, जन्म: १० नोव्हेंबर १९२५).
 • १९९१: सुइचिरो होंडा (होंडा कंपनी चे स्थापक, जन्म: १७ नोव्हेंबर १९०६).
 • १९९२: अच्युतराव पटवर्धन (स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते, जन्म: ५ फेब्रुवारी १९०५).
 • १९९७: के. पी. आर. गोपालन (स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते, जन्म: १९०६).
 • २०००: लाला अमरनाथ भारद्वाज (भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर, जन्म: ११ सप्टेंबर १९११).
 • २००१: ज्योत्स्‍ना भोळे (गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री, जन्म: ११ मे १९१४).
 • २०१४: चापमॅन पिंचर (भारतीय - इंग्रजी इतिहासकार, जन्म: २९ मार्च १९१४).

दिनविशेष        ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑगस्ट महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.