Loading ...

दैव आणि गावंढळ मनुष्य

दैव आणि गावंढळ मनुष्य, इसापनीती कथा - [Daiv Aani Gavandal Manushya, Isapniti Katha] इतक्या अल्प अवकाशात तुम्ही एवढे श्रीमंत कशाने झाला.

दैव आणि गावंढळ मनुष्य - इसापनीती कथा | Daiv Aani Gavandal Manushya - Isapniti Katha
एका मनुष्यापाशी बराच पैसा होता, पण तेवढयाने त्याचे समाधान होईना.

कित्येक व्यापारी लोकांनी अगदी थोडया वेळात हजारो रूपये मिळविलेले पाहून, आपणही व्यापारावर पैसा मिळवावा, असे त्यास वाटले. मग त्याने काही भांडवलावर व्यापार केला व त्यात त्यास सुदैवाने पुष्कळ पैसा मिळाला. ‘इतक्या अल्प अवकाशात तुम्ही एवढे श्रीमंत कशाने झाला?’ असा काही लोकांनी त्यास प्रश्न केला; तेव्हां तो म्हणतो, ‘हे सगळे चातुर्याचे आणि उदयोगाचे फळ आहे.’ मिळालेल्या पैशांत समाधान मानून तो मनुष्य जर स्वस्थ बसला असता, तर त्यास आपले सगळे आयुष्य मोठया सुखाने घालविता आले असते, परंतु दुर्दैवाने आणखी द्रव्य मिळविण्याची इच्छा त्यास उत्पन्न झाली. शेवटी व्यापार करता करता सगळेच पारडे फिरले आणि एके दिवशी तर दुपारच्या जेवणाचीही त्यास भ्रांत पडली! ही त्याची दुःस्थिती ऐकून काही लोक त्याच्या समाचारास आले.

त्यांनी त्यास विचारले, ‘अहो, ही इतकी वाईट स्थिती तुम्हांस आली तरी कशी?’ तो म्हणाला, ‘हे सगळे माझ्या दैवाचे खेळ आहेत; माझ्या दैवाने माझी अशी स्थिती केली.’ दैव जवळच होते, त्याने हे शब्द ऐकताच त्यास म्हटले, ‘अरे बाबा, तुला जेव्हा पैसा मिळाला होता, तेव्हा जर तुला माझी आठवण झाली नाही, तर आता तुझ्या हया दुःस्थितीचे खापर तू माझ्या कपाळावर का फोडतोस ?’
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची