Loading ...

संत तुकाराम महाराज (मातीतले कोहिनूर)

संत तुकाराम महाराज (मातीतले कोहिनूर) - आपल्या जीवनातून व अभंगातून शुद्ध परमार्थधर्माच्या स्थापनेचे कार्य करणारे जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज.

संत तुकाराम महाराज (मातीतले कोहिनूर)

आपल्या जीवनातून व अभंगातून शुद्ध परमार्थधर्माच्या स्थापनेचे कार्य करणारे संत तुकाराम महाराज


संत तुकाराम महाराज (मातीतले कोहिनूर)

(Sant Tukaram Maharaj) शके १६०८ - ९ मार्च १६५० संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू (पुणे जिल्हा) येथील, भगवद्‍गीता, ज्ञानेश्वरी, एकनाथाचे रामायण इत्यादिंचा त्यांचा व्यासंग होता. आपल्या जीवनातून व अभंगातून शुद्ध परमार्थधर्माच्या स्थापनेचे कार्य त्यांनी केले.



तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातल्या चार संभाव्य तारखा इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत. इ.स. १६५० मध्ये एका सार्वजनिक समारंभात त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेला असे मानले जाते.

तुकाराम महाराजाचा जन्म देहू (पुणे जिल्हा) येथे झाला, भगवद्‍गीता, ज्ञानेश्वरी, एकनाथाचे, रामायण इत्यादिंचा त्यांचा व्यासंग होता आपल्या जीवनातून व अभंगातून शुद्ध परमार्थधर्माच्या स्थापनेचे कार्य त्यांनी केले. संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा आराध्यदेव होता. तुकारामांना वारकरी ‘जगद्‌गुरु’ म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी...

‘पुंडलीक वरदे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय
जगद्‌गुरु तुकाराम महाराज की जय’

...असा जयघोष करतात.

तुकोबांचे अभंग


तुकारांमांचा परंपरागत सावकारीचा व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली. सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांच्या अभंग लिहिण्याचे काम केले.

देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केला. मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले.

पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामाने संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितला म्हणून तुकारामाच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. पण त्या बुडालेल्या गाथा तेरा दिवसांनी नदीतून परत वर आलेल्या पाहून रामेश्वर भटांना पश्चात्ताप झाला व त्यांनी तुकारामांचे शिष्यत्व पत्करले.

तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते. संत बहिणाबाई या तुकारामांच्या शिष्या. तुकारामांनीं त्यांना स्वप्नात गुरूपदेश दिला होता. तुकाराममहाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तुकाराम महराजांनी त्यांना साक्षात दर्शन दिले होते, असे म्हणतात.

फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे वैकुंठ गमन झाले. हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो.



संत तुकाराम महाराज (मातीतले कोहिनूर) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची