९ मार्च दिनविशेष - [9 March in History] दिनांक ९ मार्च च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
दिनांक ९ मार्च च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
उस्ताद झाकिर हुसैन - (९ मार्च १९५१) तालगंधर्व - ते म्हणजे तबला आणि तबला म्हणजे ते. खरंतर एवढीच त्यांची ओळख पुरेशी आहे. भारतीय संगीताचा दर्दी चाहता असलेल्या संगीत रसिकाला एवढ्या माहितीवरूनच त्यांना ओळखता येते, हे अगदी खरं आहे. एवढंच कशाला, कोणत्याही सामान्य माणसालाही काहीही माहिती न सांगता त्यांच्या तबल्याचा एक ‘तुकडा’ ऐकवा आणि तोही सर्वात प्रथम विचारेल ते त्यांचेच नाव. उस्ताद झाकिर हुसैन आहेत का? होय. उस्ताद झाकिर हुसैन अल्लारखाँ कुरेशी हे त्यांचे पूर्ण नाव. पण तबला म्हटला की झाकिरभाई हीच त्यांची खरी ओळख, जणू काय तबलावादनाचा ‘ब्रॅण्ड’च.वयाच्या अवघ्या १२व्या वर्षापासून झाकिर आपले वडिल व गुरु उस्ताद अल्लारखाँबरोबर तबला वादन करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होत असत. १९७० साली म्हणजे वयाच्या १९व्या वर्षी झाकिर अमेरिकेत संगीत शिक्षणाच्या पुढील वाटचालीसाठी दाखल झाले आणि तेथून सुरू झाला तो त्यांच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचा प्रवास; जो आजतायागत अव्याहत सुरू आहे.
जागतिक दिवस
- शिक्षक दिन: लेबेनॉन.
- १९३५: अॅडॉल्फ हिटलरने जर्मन वायुदल लुफ्तवाफेची स्थापना केल्याचे जाहीर केले.
- १९५७: अलास्काच्या अँड्रियानोफ द्वीपसमूहाजवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.१ तीव्रतेचा भूकंप झाला त्यामुळे ५० फूटी त्सुनामी तयार झाले.
- १९५९: बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात.
- १९९२: हिंदी साहित्यिक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के.के. बिर्ला प्रतिष्ठान तर्फे पहिला सरस्वती पुरस्कार प्रदान.
- २००४: पाकिस्तानने २,००० कि.मी. पल्ल्याचे शाहीन-२ (हत्फ-६) या क्षेपणास्त्राचे सफल परीक्षण केले.
- २००६: एन्सेलाडस या शनिच्या चंद्रावर द्रवरुपात पाणी असल्याचा शोध लागला.
- २००८: गोव्याचे राज्यपाल एस.सी. जमीर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार घेतला.
- २०१८: बिप्लब कुमार देब त्रिपुराचे १०वे मुख्यमंत्री झाले.
- १८६३: भाऊराव बापूजी कोल्हटकर, मराठी गायक आणि नट.
- १८९९: यशवंत दिनकर पेंढारकर, मराठी कवी.
- १९३०: युसुफखान महंमद पठाण, मराठी लेखक, संतसाहित्याचे अभ्यासक.
- १९३१: डॉ. करणसिंग, भारतीय परराष्ट्रमंत्री
- १९३८: हरिकृष्ण देवसरे, मराठी बालसाहित्यकार व संपादक
- १९४३: बॉबी फिशर, अमेरिकन बुद्धिबळ खेळाडू.
- १९५१: उस्ताद झाकिर हुसैन अल्लारखाँ कुरेशी, भारतीयतबलावादक.
- १९५६: शशी थरूर, केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ.
- १९७०: नवीन जिंदाल, भारतीय उद्योगपती.
- १९८५: पार्थिव पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू .
- १६५०: संत तुकाराम,एक वारकरी संत.
- १९६८: हरिशंकर शर्मा, भारताचे प्रसिद्ध साहित्यकार, कवि, लेखक, व्यंगकार आणि पत्रकार.
- १९६९: सर होर्मुसजी पेरोशॉ तथा होमी मोदी, उद्योगपती, प्रशासक व संसदपटू.
- १९७१: के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.
- १९९४: देविका राणी, पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेत्या अभिनेत्री.
- २०००: उषा मराठे-खेर ऊर्फ उषा किरण, अभिनेत्री.
- २०१२: जॉय मुखर्जी, चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक.
- २०१७: वि. भा. देशपांडे, ज्येष्ठ नाट्य समीक्षक व लेखक.
- २०१८: पतंगराव कदम, भारतीय राजकीय नेते.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / मार्च | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |
अभिप्राय