
गणपत पाटील / Ganpat Patil - (१९२० - २३ मार्च २००८) मराठी चित्रपटातील अभिनेते असलेले गणपत पाटील हे तमाशापटांतील ‘नाच्या’च्या भूमिकांमधील त्यांच्या अद्वितीय अभिनयाबद्दल ते प्रसिद्ध होते.
जागतिक दिवस
२३ मार्च रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- जागतिक हवामान दिन.
ठळक घटना (घडामोडी)
२३ मार्च रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी- १७७५: अमेरिकन क्रांतीदरम्यान पॅट्रिक हेन्रीने आपले रिचमंड, व्हर्जिनिया येथे मला स्वातंत्र्य द्या, नाहीतर मला मृत्यू द्या हे भाषण केले.
- १८०१: रशियाचा झार पॉल पहिल्याची हत्या.
- १८३९: बॉस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ.के. या शब्दाचा पहिला छापील उपयोग.
- १८४८: जॉन विक्लिफ या जहाजातून स्कॉटिश लोक न्यूझीलंडच्या ड्युनेडिन शहराजवळ उतरले व त्यांनी पुढे तेथे वसाहत निर्माण केली.
- १८५७: न्यूयॉर्क शहरात पहिले उद्वाहक(लिफ्ट) सुरू करण्यात आली.
- १९३१: भारतीय क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशी.
- १९४२: जपानी सैन्याने अंदमान बेटे काबीज केली.
- १९५०: जागतिक हवामान संघटनेची स्थापना.
- २००१: रशियाचे मिर हे अंतराळ-स्थानक पृथ्वीवर कोसळले.
- २००३: २००३ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर मात.
- २००५: टेक्सास सिटी येथील तेल शुद्धीकरण कारखान्यात स्फोट होऊन १५ कामगार मृत्युमुखी पडले.
- २००७: इराणच्या आरमाराने रॉयल नेव्हीच्या सैनिकांना पकडले.
जन्म (वाढदिवस, जयंती)
२३ मार्च रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १६४५: विल्यम किड / कॅप्टन विल्यम किड / कॅप्टन किड (स्कॉटिश समुद्री कर्णधार, समुद्री चाचा, मृत्यू: २३ मे १७०१).
- १६९९: जॉन बार्ट्राम (अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ).
- १७२३: आगा मोहम्मद खान घजर (इराणचे राजे).
- १७४९: पिएर सिमॉन दि लाप्लास (फ्रेंच गणितज्ञ).
- १८२३: स्कायलर कोलफॅक्स (अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष).
- १८३१: एडुआर्ड श्लेगिन्ट्वाइट (जर्मन लेखक).
- १८८१: रॉजर मार्टिन दु गार्ड (नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक).
- १८८१: हेर्मान स्टॉडिंगर (नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ).
- १८८७: फेलिक्स युसुपोव्ह (रास्पुतिनचा मारेकरी).
- १९१०: डॉ. राममनोहर लोहिया (भारतीय स्वातंत्र्यसैनिक).
- १९१२: वर्नर फॉन ब्रॉन (जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व अभियंता).
- १९३१: व्हिक्टर कॉर्चनॉय (रशियन बुद्धिबळपटू).
- १९३८: मेनार्ड जॅक्सन (अटलांटाचे पहिले श्यामवर्णीय महापौर).
- १९६८: मायकेल आथरटन (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
- १९७९: इमरान हाश्मी (हिंदी चित्रपट अभिनेते).
- १९९८: हजरतुल्लाह झझई (अफगाणिस्तानचे क्रिकेट खेळाडू, हयात).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
२३ मार्च रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- २००७: श्रीपाद नारायण पेंडसे (मराठी कथालेखक, मराठी कादंबरीकार, मराठी साहित्यिक, जन्म: ५ जानेवारी १९१३).
- २००८: गणपत पाटील (मराठी चित्रपट अभिनेते, जन्म: १९२०).
गॅलरी (२३ मार्च दिनविशेष)
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
मार्च महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहानवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण