दिनांक ६ मार्च च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
श्यामची आई - मराठी चित्रपट - (प्रदर्शित ६ मार्च १९५३) श्यामची आई हा पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आणि इ.स. १९५३ साली पडद्यांवर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिग्दर्शिला असून माधव वझे, वनमाला व दामूअण्णा जोशी या अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका रंगवल्या आहेत. इ.स. १९५४ साली या चित्रपटाला भारतीय केंद्रशासनातर्फे दिला जाणारा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
जागतिक दिवस
- स्वांतत्र्य दिन: घाना.
- अलामो दिन: टेक्सास.
- १८४०: बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.
- १८६९: दिमित्री मेन्डेलीफने मूलभूत घटकपदार्थांची आवर्त सारणी प्रकाशित केली.
- १९५३: मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट पडद्यावर आणला.
- १९९२: मायकेल एंजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.
- १९९७: स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.
- २०१७: भारतीय आरमाराची विमानवाहून नौका आयएनएस विराट सेवानिवृत्त.
- १८९९: शि. ल. करंदीकर, मराठी लेखक.
- १९३७: व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा, रशियन अंतराळयात्री.
- १९५७: अशोक पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६५: देवकी पंडित, भारतीय शास्त्रीय गायिका.
- १८९२: अंबिका चक्रवर्ती, भारतीय क्रांतिकारी.
- १९६८: नारायण गोविंद तथा ना.गो. चापेकर, मराठी साहित्यिक.
- १९७३: पर्ल बक, अमेरिकन लेखिका.
- १९८१: गो. रा. परांजपे, रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे पहिले भारतीय प्राचार्य.
- १९८२: रामभाऊ म्हाळगी, भारतातील खासदार.
- १९९२: रणजित देसाई, सुप्रसिद्ध मराठी लेखक.
- १९९९: सतीश वागळे, हिंदी आणि मराठी चित्रपट निर्माता.
- २०१८: शम्मी, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / मार्च | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |