२९ मार्च दिनविशेष - [29 March in History] दिनांक २९ मार्च च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
दिनांक २९ मार्च च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
उत्पल दत्त - (२९ मार्च १९२९ - १९ ऑगस्ट १९९३) उत्पल दत्त (Utpal Dutt) हे भारतीय चित्रपट सृष्टितील एक प्रसिध्द अभिनेते होते, ज्यांनी हिंदी व बंगाली चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली. एक अभिनेता म्हणुन त्यांनी सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. खासकरुन ते विनोदी शैलीतील अभिनयासाठी ओळखले जातात.
जागतिक दिवस
- बोगांडा दिन:मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक
- युवा दिन: तैवान
- राष्ट्रीय नौका दिवस
- ५३७: व्हिजिलियस पोपपदी
- १६३२: सेंट जर्मेनचा तह - इंग्लंडने तीन वर्षांपूर्वी जिंकलेला कॅनडाचा क्वेबेक प्रांत फ्रांसला परत केला
- १७९२: स्वीडनचा राजा गुस्ताव तिसऱ्याचा मृत्यू. गुस्ताव चौथा एडोल्फ राजेपदी
- १८०९: स्वीडनमध्ये राजा गुस्ताव चौथ्या एडोल्फविरुद्ध उठाव. स्वीडनचा भाग असलेल्या फिनलंडने रशियाशी संधान बांधले
- १८४७: मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - जनरल विनफील्ड स्कॉटच्या नेतृत्त्वाखाली अमेरिकेच्या सैन्याने व्हेराक्रुझ शहर जिंकले
- १८४९: ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीने पंजाब खालसा केले
- १८५७: मंगल पांडे या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो
- १८८२: नाइट्स ऑफ कोलंबस या संस्थेची स्थापना
- १९३६: जर्मनीत एडॉल्फ हिटलरने जनतेकडे र्हाइनलँड बळकावण्यासाठी कौल मागितला. याला ९९.५% मतदारांनी उजवा कौल दिला
- १९६२: भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या पेनिसिलिन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे अनावरण झाले
- १९४२: दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने जर्मनीतील लुबेक गावावर बॉम्बफेक केली
- १९४५: दुसरे महायुद्ध - इंग्लंडवर व्ही-१ या उडत्या बॉम्बचा शेवटचा हल्ला
- १९७१: व्हियेतनाम युद्ध-माय लाईची कत्तल - निरपराध व निःशस्त्र नागरिकांची हत्या करणाऱ्या अमेरिकन सैनिक लेफ्टनंट विल्यम कॅलीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली
- १९७३: व्हियेतनाम युद्ध - शेवटच्या अमेरिकन सैनिकांनी दक्षिण व्हियेतनाममधून माघार घेतली
- १९८२: एन.टी. रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली
- १९९३: एदुआर्द बॅलादुर फ्रांसच्या पंतप्रधानपदी
- २००३: बल्गेरिया, एस्टोनिया, लात्व्हिया, लिथुएनिया, रोमेनिया, स्लोव्हाकिया व स्लोव्हेनियाला नाटोचे सभासदत्त्व
- २००४: भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तान विरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३०९ धावांची खेळी केली व त्रिशतक झळकवणारा पहिला भारतीय फलंदाज झाला
- २०१०: दोन आत्मघातकी स्त्री दहशतवाद्यांनी मॉस्कोच्या उपनगरी रेल्वेत सकाळच्या गर्दीत स्फोट घडवले. ४० ठार
- १५५३: व्हित्सेंत्झोस कोमारोस, ग्रीक कवी
- १७९०: जॉन टायलर, अमेरिकेचा दहावा राष्ट्राध्यक्ष
- १७९९: एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
- १९००: जॉन मॅकइवेन, ऑस्ट्रेलियाचा १८वा पंतप्रधान
- १९२९: उत्पल दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता
- १९२९: लेनार्ट मेरी, एस्टोनियाचा राष्ट्राध्यक्ष
- १९४३: जॉन मेजर, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
- १९६८: ल्युसी लॉलेस, न्यू झीलँडची अभिनेत्री
- १०५८: पोप स्टीवन नववा
- १३६८: गो-मुराकामी, जपानी सम्राट
- १९५९: बार्थेलेमी बोगांडा, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष
- १९६२: करमचंद थापर, भारतीय उद्योगपती
- १९६४: शंकर नारायण जोशी, भारतीय इतिहाससंशोधक
- १९९७: श्रीमती पुपुल जयकर, भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या
मार्च महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |
अभिप्राय